वैज्ञानिक पद्धतीने संशोधन करणे म्हणजे नक्की काय?
वैज्ञानिक पद्धती : निरीक्षण, प्रयोग, परीक्षण व सामान्यीकरण याद्वारे ज्ञानाची बांधणी म्हणजे वैज्ञानिक पद्धती होय. अल्हाझेन या वैज्ञानिकाने ११ व्या शतकात भौतिक प्रयोगाद्वारे सिद्ध केले की, "जी वस्तू आपल्या डोळ्यांना दिसते, तेथून प्रकाश सरळ रेषेत आपल्या डोळ्यात प्रवास करतो." हा वैज्ञानिक पद्धतीने प्रथम काढलेला निष्कर्ष आहे. या कल्पनेच्या आधारावर फ्रँकिस बेकन यांनी इ.स. १६२० मध्ये वैज्ञानिक पद्धतीचा पाया घातला. संशोधन : नैसर्गिक शास्त्रात किंवा सामाजिक शास्त्रात घडणाऱ्या घटनांचे स्पष्टीकरण व त्या घटनांना नियमन करणारी तथ्य यांच्याविषयी सामान्य नियम शोधण्यासाठी केलेला पद्धतशीर प्रायोगिक प्रयत्न म्हणजे संशोधन होय. ज्ञान म्हणजे उत्तर जाणून घेणे किंवा समस्येवर उपाय सुचवणे. उपयोजन म्हणजे ज्ञानाद्वारे जाणून घेतलेल्या उपायांची अंमलबजावणी करणे वैज्ञानिक पद्धतीचे सामान्यतः सहा ते सात टप्पे असतात. १. समस्या सूत्रन : 'असे का' याचे उत्तर माहीत नसेल तर त्या गोष्टीला समस्या म्हणतात. उदा. शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी आहे, ही विशिष्ट समस्या निश्चित केली. २. माहिती (तथ्य) संकलन ...