सूर्य पृथ्वीभोवती फिरतो की पृथ्वी सूर्याभोवती फिरते ? Earth revolves around the Sun or Sun revolves around the Earth?

सूर्यमाला solar system पृथ्वीसापेक्ष पृथ्वी, ग्रह व इतर तार्‍यांची गती सूर्य ग्रह व इतर तार्‍यांची गती
पृथ्वीसापेक्ष सूर्य ग्रह व इतर तार्‍यांची गती


1. पृथ्वीवर सगळ्या गोष्टी स्थिर असतात.
आपण पृथ्वीवर वावरताना आपल्याला पृथ्वी फिरताना अजिबात दिसत नाही. यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की पृथ्वी स्थिर आहे.
परंतु जेव्हा आपण चालू बसमध्ये बसलेलो असतो, तेव्हा आपल्याला आपण, आपल्या सोबतच्या वस्तू तसेच सहप्रवासी स्थिर दिसतात, परंतु या सर्वांची गती ही बसच्या गती एवढी असते. यावरून असे सिद्ध होते की आपली पृथ्वीसापेक्ष गती ही शून्य आहे. त्यामुळे आपल्याला पृथ्वी स्थिर दिसते. (Relative motion is zero)

2. सूर्य, चंद्र व तारे यांचे उगवणे व मावळणे
सूर्य सकाळी पूर्वेला उगवतो आणि संध्याकाळी पश्चिमेला मावळतो तसेच चंद्र आणि आकाशातील तारे ही पूर्वेला उगवून पश्चिमेला मावळतात. यावरून असा निष्कर्ष काढू शकतो की सूर्य, चंद्र व तारे पृथ्वीभोवती फिरताहेत. परंतु सोळाव्या शतकात कोपर्निकस या पोलिश अवकाश निरीक्षकाने काही गोष्टी दाखवून दिल्या
की काही ग्रह ठराविक वेळी ठराविक दिशेला दिसतात. सूर्य मावळताना आकाशात दिसणाऱ्या गुरू व शुक्र हे ग्रह उगवत व मावळत नाहीत तर अवकाशात विशिष्ट वर्तुळाकार पद्धतीत फिरतात ही त्यांची गती त्यांच्यामागे असणाऱ्या ताऱ्यांच्या सापेक्ष दिसते. यावरून हे ग्रह पृथ्वीभोवती नक्कीच फिरत नाहीत हे सिद्ध झाले.

3. आपण ग्रह कसे ओळखायचे व ते आकाशात कधी दिसतात?
आपल्याला माहित आहे की तारे आकाशात लुकलुकतात तर सूर्यमालेतील उघड्या डोळ्यांनी दिसणारे ग्रह लुकलुकत नाहीत. ताऱ्यांपासून येणारा प्रकाश कमी तीव्रतेचा असतो तर ग्रह हे सूर्याचा प्रकाश परावर्तित करत असल्यामुळे त्यापासून येणारा प्रकाश जास्त तीव्रतेचा असतो. वातावरणाच्या विविध थरांचे तापमान सतत बदलत असल्यामुळे त्यांच्या घनातेत बदल होत असतो परिणामी त्याचे अपवर्तनांक सतत बदलत असतात. कमी तीव्रतेचा प्रकाशाचे वातावरणातून येताना वातावरणातून येताना सतत अपवर्तन (refraction) होते. 
गुरु ग्रह सायंकाळी पश्चिम (वायव्येला) दिशेला क्षितिजाच्या 45 अंश वर अंतरावर सर्वात प्रथम दिसतो. त्यानंतर सायंकाळीच थोड्याच वेळाने पश्चिमेला शुक्र ग्रह क्षितिजाच्या थोड्या वर अंतरावर दिसतो तसेच मंगळ व शनि हे ग्रह मध्यरात्री आकाशात डोक्यावर दिसतात.

4. सत्य जगासमोर आणण्यासाठी केलेला संघर्ष
पूर्वीपासून चालत आलेली मान्यता - पृथ्वी केंद्रभागी असून बाकीचे ग्रहतारे पृथ्वीभोवती फिरतात ही संकल्पना खोडून कोपर्निकसने हे सिद्ध केले की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत आहे हे कार्य करताना त्याला अनेक रूढीवादी शक्तींचा सामना करावा लागला. त्याने त्याचे कार्य ई. स.1514 मध्ये एका पुस्तिकेत प्रकाशित केले. त्यानंतर त्याचा शिष्य जर्मन शिष्य रेटीकस याने कोपर्निकस यांच्या सोबत कार्य करून 1539 मध्ये सूर्यमालेचे प्रतिमान निर्माण केले व त्यांचे कार्य 1540 मध्ये संशोधन पत्रिकेत ही प्रसिद्ध केले. हाच काळ युरोपमध्ये ज्ञानाच्या पुनर्निर्मिती ठरला. संघर्षाविना ज्ञान मिळत नाही ही हे युरोपिय बुद्धिवाद्यांनी सिद्ध केले. त्यानंतर कोपरनिकसचा आणखी एक शिष्य केपलर याने ग्रह सूर्याभोवती वर्तुळाकार कक्षेत फिरत नसून लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतात हे 1609 मध्ये दाखवून दिले. दुर्बिणीचा शोध लागल्यानंतर 1610 मध्ये गॅलिलिओने गुरूच्या चंद्रांची निरीक्षण करून कोपर्निकसच्या सूर्य केंद्रस्थानी असलेल्या सिद्धांताला मान्यता दिली.
कोपर्निकस चे सूर्य केंद्रस्थानी असलेले प्रतिमानचे सूर्य केंद्रस्थानी असलेले प्रतिमान
Image credit: astro.hopkinsschools.org

 वैज्ञानिक पद्धती

1. कुतूहल किंवा प्रश्न
पृथ्वी सूर्याभोवती फिरते की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो

2. गृहितक
1. सूर्य पृथ्वीभोवती फिरतो
 2.  पृथ्वी सूर्याभोवती फिरते

3. प्रयोग किंवा निरीक्षण
सूर्य, चंद्र व तारे यांचे उगवणे व मावळणे यांचे पृथ्वीभोवती फिरणे
फक्त काही ग्रह  ठराविक ठिकाणी उगवणे व मावळणे
गृहितक १ निष्क्रिय

4. माहिती 
अनेक वर्षांचे अवकाश निरीक्षणाची तक्ते

 5.  विश्लेषण
सूर्य केंद्रस्थानी असून ग्रह त्याच्याभोवती फिरत आहेत हे प्रतिमान निर्माण केले

6. निष्कर्ष व अहवाल
सूर्य केंद्रभागी असून बाकीचे ग्रह सूर्याभोवती फिरतात

Comments

ह्या पोस्ट नक्की वाचा.

जैवविविधतेचे संवर्धन करण्याचे ६ फायदे, 6 benefits of Conserving Biodiversity

१० विज्ञानविषयक पुस्तके (मराठीतून) जी तुम्ही वाचायलाच हवीत!! 10 Science Books in Marathi you must read!!

आयुका :IUCAA ,पुणे

संन्याशासारखा विचार करा या जय शेट्टी यांच्या पुस्तकची प्रस्तावना; Introduction : Think Like a Monk by Jay Shetty (Marathi)