नोबेल पारितोषक:भारताची सद्यस्थिती(Nobel Prize:Current Situation of India)
नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे.रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या पाच क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या किमयागारांना नोबेल पारितोषिकाने पुरस्कृत केले जाते. काळाच्या किनाऱ्यावर तुमची पावले ठसवायची असतील तर तुमचे पाय फरपटून देऊन कसे चालेल? हे वाक्य आपल्या भारतीय तरुणांना उद्देशून वापरावेसे वाटते कारण, नोबेल पारितोषिकाची सुरुवात झाल्यापासून ते आजतागायत आपल्या देशाच्या वाट्याला हातावर मोजता येतील एवढीच नोबेल पारितोषके मिळालेली आहेत, यामध्ये रवींद्रनाथ टागोर, सी. व्ही. रमण, अमर्त्य सेन, कैलाश सत्यार्थी, हरगोविंद सिंग खुराणा, सुब्रमण्यम चंद्रशेखर, व्यंकटरमण रामकृष्णन, अभिजीत बॅनर्जी या व्यक्तींचा समावेश होतो. या व्यक्तींनी आपल्या जीवनातील आंतरिक ऊर्जेचा जादुभरा स्रोत वापरून जी भरीव कामगिरी केली तिला व्यवसाय कधीच बनू दिले नाही त्यास ध्यास, ध्येय व धर्म बनवले व पूर्ण कार्यक्षमतेने कार्य केले. आजही पालक आपल्या मुलांना डॉक्टर, इंजिनिअर बनण्याची स्वप्ने पाहतात. यामध्ये किती पालक आहे जे आपल्या पाल्यांना ...