Posts

Showing posts from October, 2020

आयुका :IUCAA ,पुणे

Image
२८फेब्रुवारी १९२८ रोजी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ 'चंद्रशेखर व्यंकट रमण' यांनी 'रमण परिणाम'चा शोध लावला व त्यांना  या शोधा निमित्त 'नोबेल' पारितोषिक प्राप्त झाले आणि या दिवसाचे औचित्य साधून २८फेब्रुवारी हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा करतात. त्या दिवशी सर्वांसाठी ज्ञान विज्ञाचा अमूल्य खजाना खुला करण्यासाठी सुसज्ज  असते आपल्या जयंत नारळीकर सरांची 'आयुका'.  पुणे विद्यापीठाच्या आवारात एक संशोधन संस्था 'आयुका' नावाने सुप्रसिद्ध तसेच अत्यंत लोकप्रिय आहे.१९८८ मध्ये जागतिक  दर्जाची ख्याती असणारे  खगोलशास्त्रज्ञ 'जयंत नारळीकर' यांनी अजित केंभावी व नरेश दधीच यांच्यासोबत आयुकाची स्थापना केली. विज्ञान प्रेमींना आपला विज्ञान दिवस अविस्मरणीय घालवायचा असेल तर पुण्यातील आयुका सारखे उत्तम ठिकाण दुसरे नसेल. विद्यापीठातील प्रवेशद्वारापासून पायी चालत जाताना विद्यापीठातील भुलभुलय्या ठरलेले रस्ते जरा वेळ घेत असत, पण आता तीही समस्या गायब झाली आहे.जवळच इको-फ्रेंडली बस येते व विद्यापीठांमध्ये हवे त्या  ठिकाणी सोडते, ते ही अगदी विनामूल्य. विज्ञान

नोबेल पारितोषक:भारताची सद्यस्थिती(Nobel Prize:Current Situation of India)

Image
नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे.रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या पाच क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या किमयागारांना नोबेल पारितोषिकाने पुरस्कृत केले जाते. काळाच्या किनाऱ्यावर तुमची पावले ठसवायची असतील तर तुमचे पाय फरपटून देऊन कसे चालेल? हे वाक्य आपल्या भारतीय तरुणांना उद्देशून वापरावेसे वाटते कारण, नोबेल पारितोषिकाची सुरुवात झाल्यापासून ते आजतागायत आपल्या देशाच्या वाट्याला हातावर मोजता येतील एवढीच नोबेल पारितोषके मिळालेली आहेत, यामध्ये रवींद्रनाथ टागोर, सी. व्ही. रमण, अमर्त्य सेन, कैलाश सत्यार्थी, हरगोविंद सिंग खुराणा, सुब्रमण्यम चंद्रशेखर, व्यंकटरमण रामकृष्णन, अभिजीत बॅनर्जी या व्यक्तींचा समावेश होतो. या व्यक्तींनी आपल्या जीवनातील आंतरिक ऊर्जेचा जादुभरा स्रोत वापरून जी भरीव कामगिरी केली तिला व्यवसाय कधीच बनू दिले नाही त्यास ध्यास, ध्येय व धर्म बनवले व पूर्ण कार्यक्षमतेने कार्य केले. आजही पालक आपल्या मुलांना डॉक्टर, इंजिनिअर बनण्याची स्वप्ने पाहतात. यामध्ये किती पालक आहे जे आपल्या पाल्यांना

चुंबक

Image
मॅग्नेटाईट नावाच्या लोखंडाच्या किंवा पोलादाच्या खाणीत आढळणार्‍या एक प्रकारच्या पदार्थाचा दगड. त्याचे  'लोडस्टोन' असे नाव होते.या पदार्थात चुंबकाचे गुणधर्म होते. ख्रिस्तपूर्व ८०० च्या सुमारास ग्रीक लोकांनी चुंबकाचा उल्लेख आपल्या लिखाणात केला आहे.जाणून घेऊया  चुंबकाविषयी...                       चुंबक

रामानुजन

Image
श्रीनिवास रामानुजन (जन्म : तिरोड-तंजावर, २२ डिसेंबर १८८७; मृत्यू : कुंभकोणम, २६ एप्रिल १९२०) भारतीय गणितज्ञ होते. रामानुजन हे अलौकिक गणिती होते. रामानुजन हे गणिताचा विचार करीत असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे म्हणूनच ते झोपेतून जागे होताच अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत. या महान गणित्तज्ञा वर बोलू काही...               रामानुजन गणितज्ञ रामानुजन होते महान संपूर्ण जगात आजही त्यांना मानाचे स्थान प्रतिभावंत बुद्धीला   जग आजही करते सलाम कायच अलौकिक आहे दुनियेचा त्यास सलाम अंकांची त्यांची दुनिया अंकांमध्ये व्यस्त असत अंक हा त्यांचा ईश्वर, अंकांची पूजा करत २२ डिसेंबर १८८७  या दिनी चिरस्मरणीय मंगलमय घटना घडली या क्षणी या मंगल दिनी रामानुजन यांचा जन्म गणिताच्या इतिहासात नवव्या प्रतिमेस मिळाला पुनर्जन्म पाचव्या वर्षी सुरू केला विद्याभ्यास आपल्या कुशाग्र बुद्धीने शिक्षकांचे बनले ते खास गणितामध्ये प्रथम येणे होते त्यांचे स्वप्न त्यासाठीच अप्पर प्रायमरी परीक्षा तयारी असायचे ते मग्न ४२/४५  गुण मिळवले अंकगणितात पैकीच्या पैकी गुण नसल्याने बुडाले दुःखात पहिला शोधप्रब

विज्ञानवाटा

Image
आईन्स्टाईन कुशाग्र बुद्धिमत्तेच्या होता हा आदर भाव ठेवणे अतिउत्तम आहे पण आपण सर्वसामान्य आहोत, विज्ञान समजण्याची कुवत असतानाही या बाबतीत मनात विचार आणणे ही महापाप आहे. काय झाले आपण न्यूटन आइन्स्टाईन नसलो तर मनातील उत्कंठा शमवण्यासाठी अशा ज्ञानपिपासू नी आपलं लॉजिक विकसित करणे व प्रयोगाची तयारी ठेवली तरी विज्ञानवाटांवर हे ज्ञान पिपासू आनंदाने चालू शकतात. आता म्हणजे नक्की काय करायचं, हे सुचवणारा हा 'विज्ञानवाटा' नावाचा लेख...    विज्ञान, विज्ञान म्हणजे खुप गंभीरतेने वाचण्यासारखा किंवा आंबट तोंड लांब चेहरे करून ऐकण्यासारखा विषयच नाही. फक्त सैद्धांतिक माहिती वाचून किंवा सांगून माहितीचा भरमसाठ साठा करणाऱ्या प्रियजनांना सांगावेसे वाटते, आपल्या आयुष्यात विज्ञान अनुभवता आले पाहिजे, आपण त्यामध्ये जगलो पाहिजे, दैनंदिन जीवन जगताना येणाऱ्या समस्या व त्यांचे समस्या निराकरण होताना असणारी विज्ञानाची भूमिका म्हणजे खरे विज्ञान प्रेमी आयुष्य.एकंदरीत म्हणायचे झाल्यास, ज्ञानाचे उपयोजन करणे म्हणजेच प्रयोग करणे व आपल्याला काय करता येईल हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा. जेवढ्या नेमकेपणाने, टोकदा

संतुलित आहार म्हणजे काय ,तो का व कसा घ्यावा?

Image
शरीरक्रियाशास्त्रामध्ये आहार हा महत्त्वपूर्ण विषय आहे. शालेय जीवनात विज्ञानाच्या  पेपर ला घोकंपट्टी करून उत्तरं लिहितो व आहाराशी असणारा संबंधास  आहुती देतो. पृथ्वी व मानवाचा जितका प्राचीन इतिहास आहे, तितकाच मानव व त्याचा आहार आणि त्याच्याशी संबंधित असणारे आजार यांचाही ऋणानुबंध पुरातन आहे. पाषाण युगात १० ते १२ हजार वर्षांपूर्वी झालेली क्रांती व मानवाने केलेली शेती यामुळे अन्न शोधाची समस्या कायमची  संपुष्ट झाली व मानवाच्या आयुष्यात स्थैर्य प्राप्त झालं. तुम्ही काय खाता,यावरून तुम्ही कसे आहात हे आहार तज्ज्ञ तुम्हाला सांगतात. कारण आपण जे खातो त्यातून आपल्या मन  व शरीरावर परिणाम होत असतो. अहं वैश्वानरो भुत्वा प्राणिनां देहमाश्रित: । प्राण पान समा युक्त: पचाम्यन्न चतुविर्धम।।  गीतेच्या पंधराव्या अध्यायातील १४ वा श्लोक थोडक्यात हेच सांगतो की अन्नातून विविध पोषक पदार्थ ऊर्जा मिळवण्यासाठी वापरले जातात यामध्ये पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्त्वे, तसेच सेंद्रिय पोषक पदार्थ इत्यादींचा समावेश होतो.अन्न  कशाचा बनतं?त्याचं शरीरात काय होतं व त्याचे व रोगाचे काही समीकरण असते का? यांसार