१० विज्ञानविषयक पुस्तके (मराठीतून) जी तुम्ही वाचायलाच हवीत!! 10 Science Books in Marathi you must read!!


असं म्हणतात की, ग्रंथाच्या लेखकाशी संवाद साधावयाचा असेल तर तो ग्रंथ वाचा. सामान्यतः लोकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक जगामध्ये पुस्तकाचं स्थान कमी-जास्त प्रमाणात असतं. शैक्षणिक पुस्तकं आपल्या आयुष्याचा मोठा भाग असतात आणि वैज्ञानिक पुस्तकं आपलं आयुष्य अधिक आधुनिक करण्यासाठी रामबाण उपाय असतो.आपण  मागील ब्लॉग मध्ये आकाश निरीक्षण छंद जोपासणे याविषयी बोललो.  रात्रीचा छंद जोपासला रात्र तर छान गेली, दिवसा मस्तपैकी एखादे पुस्तक वाचले तर आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटेल. मग ती पुस्तके कोणती? चला तर बोलूया आज विज्ञान पुस्तकावर....

१. किमयागार : अच्युत गोडबोले 

पदार्थविज्ञान, जीवशास्त्र, भूगर्भशास्त्र, रसायनशास्त्र, वगैरेंना ज्यांनी आद्य शास्त्राचा दर्जा प्राप्त करून दिला, त्या महान शास्त्रज्ञांचा संघर्ष अत्यंत रोचक व सुलभ भाषेत लेखकाने सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याचा सर्वोत्कृष्ट प्रयत्न केला आहे

 
 
२. चार नगरातील माझे विश्व : जयंत विष्णू नारळीकर

 सुमारे साडेपाचशे पानांचे हे पुस्तक जयंत नारळीकर यांचे आत्मचरित्र आहे. त्यांना 'साहित्य अकादमीचा पुरस्कार' मिळाला आहे. नितांत निर्भेळ उगवतं असे आत्मचरित्र आहे. जयंत विष्णू नारळीकर या एका सामान्यातील असामान्य अशा संशोधकाचा सरळसोट आयुष्य चितरलेलं आहे, ज्याने वाचकांना मात्र खिळवून ठेवलं आहे. नारळीकरांना न भेटलेल्या लोकांना या पुस्तकाच्या माध्यमातून भेटता येतं, संवाद साधता येतो, जाणून घेता येतं.

 
 
३. गणिती : अच्युत गोडबोले, माधवी ठाकूर-देसाई

 गणिताची आवड निर्माण करणारी एक रसिली सफर या पुस्तकातून करता येते. गणित विषयाची भीती घालून त्याची गोडी वाढवणारं गणिताची मूलभूत तत्व इतिहास अत्यंत सोप्या व सुटसुटीत भाषेत समजावून सांगणारे हे पुस्तक आहे. यामध्ये प्राचीन संस्कृतीतील गणिताचा वापर ते आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य, पायथागोरस, न्यूटन, आर्किमिडीज, रीमन, ऑयलर, रामानुजन हे महान व्यक्ती भेटतील. अंकगणित, भूमिती, बीजगणित, कॅल्क्युलस, ग्राफ, वक्र स्पेस, टोपोलॉजी, चौथी मिती, नॉन युक्लिडियन भूमिती, सेट ग्रुप, मॅट्रिक्स, तर्कशास्त्र, संभाव्यताशास्त्र, अनंत अशा अनेक कल्पना हे पुस्तक सोप्या भाषेत समजावून सांगतात.

 
 
 ४. दोस्ती गणिताशी :मंगला नारळीकर

 गणिततज्ञ मंगला नारळीकर लिखित हे पुस्तक आहे. आपल्या बालमित्रांनी गणिताला न घाबरता या पुस्तकाच्या मदतीने गणिताचा पाया भक्कम करावा. या पुस्तकातील संकल्पना समजून घेऊन इयत्ता पाचवी साठी असलेल्या स्कॉलरशिप, नवोदय इत्यादी परीक्षा तसेच स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी उपयुक्त असे हे पुस्तक आहे.

 
 
५. काळाची जन्मकथा :स्टीफन हॉकिंग

 बिग बँक थेअरी कृष्णविवर पर्यंतची लोकप्रिय कॉस्मोलॉजी यावर असणारे पुस्तक ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी लिहिले आहे .याचे मराठी मध्ये भाषांतर सुभाष देसाई यांनी केले आहे. 1988 हे पुस्तक प्रथम प्रकाशित झाले आहे .खगोलशास्त्राचा काहीही गंध नसणाऱ्या परंतु नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा असणाऱ्या रसिकांसाठी हॉकिंग यांनी मूलभूत संकल्पना या पुस्तकातून मांडल्या आहेत.

 
 
६.दुर्बिणी आणि वेधशाळा : आनंद घैसास

  विविध दुर्बिनी त्यामागचा इतिहास त्यांचे उपयोग तसेच प्रसिद्ध अशा वेधशाळांची सविस्तर माहिती या पुस्तकातून होते.

 
 
७. मला उत्तर हवंय: मोहन आपटे 

विज्ञानातील अनेक विषयांवर उत्तर शोधण्याचा प्रयत्न मला उत्तर हवय या पुस्तकांच्या मालिकेतून करण्यात आला आहे त्यापैकी पृथ्वी विषयी माहिती देणाऱ्या पुस्तकात पृथ्वीचे वर्णन तिचे भूप्रदेश, महासागर यांची माहिती, ज्वालामुखीचे उद्रेक, भूकंपाचे हादरे, पृथ्वी बद्दलच्या अनेक शंकांची उत्तर समजावून देणारा पृथ्वी विज्ञान या पुस्तकातून आपणास कळते.

  

८. सुवर्णगरुड : मारुती चितमपल्ली


पक्षी आणि वन्य प्राणी यांचा जीवन वृत्तांत सांगणाऱ्या कथा मराठी मध्ये मांडण्याचा सुंदर प्रयत्न मारुती चितमपल्ली यांनी केलेला आहे. या पुस्तकामध्ये आपण अनामिका आणि गरुडाचे घर ,मुकणा मोर, खंड्या,रुद्धा, आणि नागेर पक्षी, शेखर नावाची खार, नकुल ,मनोली एक पाडस ,एनाक्षीमिया आणि वाघीण, पांढरा भुजंग अजगर, घुंगरू पग बांधे, रखमजी चाचा यांच्याविषयी जंगलही नाते जोडणाऱ्या कथा वाचू शकतो.

 
 
९. झाड आणि माणूस : निळू दामले

पर्यावरण विशेष पर्यावरण विशेष वनस्पती म्हणजे काय? वनस्पती म्हणजे काय? वनस्पतींचा काम कसं चालतं? हे या पुस्तकात सांगितलेलं आहे. वनस्पतीशास्त्र शिकवणारी पाठ्यपुस्तके असतात. पाठ्यपुस्तकात वनस्पतीचे विविध भाग, वनस्पतीची वाढ, वनस्पतीमध्ये विविध प्रक्रिया इत्यादी गोष्टी सांगितलेल्या असतात. पुस्तकातला मजकूर फक्त विद्यार्थ्यांसाठी असतो. झाड आणि माणूस या पुस्तकातला मजकूर वर्गात न जाता कळणार आहे. शाळा, मास्तर, परीक्षा, पास, नापास इत्यादीच्या बाहेर राहून वनस्पतींची मैत्री करण्याचा प्रयत्न या पुस्तकात आहे. हे पुस्तक वाचून वनस्पतींची गंमत कळते. या पुस्तकाची दुसरी गंमत अशी या मजकुरात माणसं आहेत, प्रसंग आहेत, घटना आहेत, किस्से आहेत आणि अर्थातच शास्त्राचा आधार असलेली माहिती आहे, म्हटलं तर ही गोष्ट आहे, म्हटलं तर ही पत्रकारिता, हे म्हटलं तर हे शिक्षण ही आहे, ज्ञान आहे, आणि गंमत ही आहे. कथा कादंबरी पत्रकारिता शिक्षण इत्यादी हेतूंसाठी तयार केल्या जाणाऱ्या मजकुराचे हेतू ठरलेले आहेत.  मजकुराची साचेबद्ध शैलीची सवय दूर सारून लेखक वाचकांशी बोलला आहे.

 
 
१०. अणूबॉम्बची कहाणी : मोहन आपटे

 ही कहाणी आहे, मानवजातीचा इतिहास बदलणारे एका अमोल शास्त्राची, न्यूट्रॉन कणांचा मारा केल्यानंतर युरेनियमचा अनुभवतो. त्याची दोन शकले उडतात ,प्रचंड वेगाने एकमेकांपासून दूर फेकली जातात, त्याच वेळी वस्तूंचा नाश होतो आणि आइन्स्टाइन यांचे E=mc2 या सूत्रानुसार त्याचे ऊर्जेत रूपांतर होते. विसाव्या शतकाचे सारे भविष्य बदलून टाकणारे हे संशोधन होते. तो कालखंड होता द्वितीय महायुद्धाचा अत्यंत विपरीत परिस्थितीत मात करून अफाट कर्तृत्व गाजवणाऱ्या माणसं या काळात मोठ्या संख्येने निर्माण झाली. सहा वर्षे रेंगाळलेले महायुद्ध अनुभवच या दोन संस्थांनी तडाखे यांनी तडकाफडकी कसे संपले, याची मोठी विलक्षण कथा या पुस्तकात वाचायला मिळते. सदर पुस्तकात पहिल्या पानापासून आपण कहाणी मध्ये गुंतत जातो व या प्रवासात एन्रिको फर्मी,  हायजिनबर्ग, नील्स बोहर, ओपन हायमर, खुद्द आईन्स्टाईन आणि अजून असंख्य वैज्ञानिकांना आपण भेटतो व अणूविच्छेदन व पुढे अनुभव पर्यंत सिद्धता यामध्ये या विभूतींची कशी भूमिका होती व एकूणच जगावर त्याचे कसे परिणाम झाले याचं कहानी मोहन आपटे सरांनी अत्यंत रसाळ शैलीत लिहिले आहे. विज्ञान विषयाचे लेखन असून हे त्यांची मराठी भाषा शैली ही अव्वल लेखकाच्या तोडीचे आहे, त्यामुळे हे पुस्तक विज्ञानाची पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तीला पण निश्चित आवडेल यात शंका नाही.

Comments

  1. दादा मला 10 पुस्तकांवर व्हिडीओ बन वायचा आहे तुमची परवानगी असेल तर सांगा

    ReplyDelete

Post a Comment

ह्या पोस्ट नक्की वाचा.

जैवविविधतेचे संवर्धन करण्याचे ६ फायदे, 6 benefits of Conserving Biodiversity

सूर्य पृथ्वीभोवती फिरतो की पृथ्वी सूर्याभोवती फिरते ? Earth revolves around the Sun or Sun revolves around the Earth?

आयुका :IUCAA ,पुणे

संन्याशासारखा विचार करा या जय शेट्टी यांच्या पुस्तकची प्रस्तावना; Introduction : Think Like a Monk by Jay Shetty (Marathi)