Posts

Showing posts from September, 2020

संन्याशासारखा विचार करा या जय शेट्टी यांच्या पुस्तकची प्रस्तावना; Introduction : Think Like a Monk by Jay Shetty (Marathi)

Image
 'संन्याश्यासारखा विचार करा' या पुस्तकाची प्रस्तावना  तुम्हाला नवीन कल्पना हवी असेल, तर जुने पुस्तक वाचा. (इव्हान पावलॉव) मी अठरा वर्षांचा होतो आणि लंडनमधील कास बिझनेस स्कूल या महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिकत होतो, त्या वेळी माझ्या एका मित्राने मला त्याच्याबरोबर एका संन्याशाचं व्याख्यान ऐकायला येण्यास सांगितलं. मी विरोध केला. ‘एखाद्या संन्याशाचं व्याख्यान ऐकायला मी का जावं?’ महाविद्यालयाच्या परिसरात मी नेहमीच सीईओंना, प्रसिद्ध व्यक्तींना आणि इतर यशस्वी लोकांना व्याख्याने देताना पाहत होतो; पण मला एखाद्या संन्याशामध्ये बिलकूल स्वारस्य नव्हतं. ज्या लोकांनी प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात काही गोष्टी मिळवलेल्या आहेत, अशा वक्त्यांचं व्याख्यान ऐकण्यास मी प्राधान्य देत होतो.  माझ्या मित्राने आग्रहच धरला आणि अखेरीस मी म्हणालो, ‘जर त्यानंतर आपण बारमध्ये जाणार असलो तरच मी येईन.’ ‘प्रेमात पडणं’ हा वाक्प्रचार जवळजवळ नेहमीच अगदी निर्णायकपणे शृंगारिक नातेसंबंधांचं वर्णन करण्यासाठी वापरला जातो; पण त्या रात्री मी त्या संन्याशाला त्याचे अनुभव सांगताना ऐकलं आणि मी त्याच्या प्रेमातच पडलो. व्यासपीठा

जेव्हा जगण्याची दिशा हरवली आहे असं वाटू लागतं, तेव्हा खंबीर मार्गदर्शक बनणाऱ्या 'संन्याशासारखा विचार करा' पुस्तकाविषयी काही... Think Like a Monk - Jay Shetty (Marathi)

Image
(अमेझॉनवर पुस्तक खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.) 'संन्याशासारखा विचार करा' पुस्तकाविषयी काही... जय शेट्टी यांच्या पुस्तकामध्ये संन्याशाची मनोरचना स्वीकारण्याचे तीन टप्पे सांगितले आहेत. पहिला टप्पा हा आपल्याला मागे खेचणाऱ्या बाह्य प्रभावांपासून, अंतर्गत अडथळ्यांपासून आणि भीतींपासून आपली सुटका करून घेणं म्हणजेच त्या गोष्टी सोडून देणं हा असतो. याला आपण ‘सोडून द्या’. किंवा ‘जाऊ द्या’ असं म्हणतो. वाढीसाठी जागा मिळवण्याकरिता करावयाची साफसफाई म्हणून आपण याचा विचार करू शकतो. ‘आपली वाढ कशी होत राहील', हा दुसरा टप्पा असतो. तुम्हाला हेतू, उद्दिष्ट आणि आत्मविश्वास यांच्यासह निर्णय घेणं शक्य व्हावं, यासाठी तुमच्या आयुष्याची पुन्हा नव्याने जडणघडण करण्यास या टप्प्याची तुम्हाला मदत होईल. आपल्या पलीकडचं जग पाहून, आपल्या मनातील कृतज्ञतेची भावना व्यापक बनवून आणि ती इतरांशी वाटून घेऊन, तसंच आपले नातेसंबंध अधिक सखोल, दृढ बनवून ‘आपण मुक्तहस्ते देऊया’ हा टप्पा येतो. आपल्याला लाभलेल्या देणग्या आणि प्रेम आपण इतरांशी वाटून घेतो आणि आपल्याला खऱ्या आनंदाचा

पृथ्वीचे मानवाला पत्र (जागतिक ओझोन संरक्षण दिन)

Image
 प्रिय मानवास,  अनेक प्रेमपूर्ण आशीर्वाद ...        मी सुरुवातीपासून स्वतःला खूप भाग्यवान समजते कारण,' जननी जन्मभूमिश्च स्वर्गदपी गरीयसी'   अशा अनमोल शब्दांमध्ये माझा गौरव केला गेला. माझ्या कुशीत जगणाऱ्या जीवसृष्टीच्या उभारणीमध्ये ऋषी, महर्षी, अध्यात्म शक्ती, व निसर्ग देवतेचा मोठा वाटा आहे. मी आदी-अनादी काळापासून लता,वेली यांनी बहरून गेले होते. तुझ्या सारख्या अनंत लेकरां बरोबर मी सुखासमाधानाने आयुष्याचा परमानंद घेत होते... पण, एक दिवस मला प्राण्या पक्षांच्या मधुर स्वरां ऐवजी जीवाचा आकांत ऐकु आला. यात वेदना व विरहाच्या संमिश्र भावना होत्या. दुःख दृश्य म्हणजे तुमचा एक बंधू धारदार  कुऱ्हाडीने माझ्या डेरेदार हिरव्या लेकरावर घाव घालून मातेपासून अलग करू पाहत होता. तेव्हाच ठरवलं, तुम्हाला योग्य तो धडा शिकवायचा.आई निष्ठूर होत नाही, ती मारते ते खून करण्यासाठी नसून आपल्या मुलांना योग्य संस्कार करणे हा त्यामागचा तिचा शुद्ध मानस असतो. आता सांगितलेला प्रसंग लहानपणापासून आपण ऐकला असेल. नंतर काय होते तर वृक्षतोड तुम्ही करत होता तेव्हा कुऱ्हाड तुमच्याच कोणाच्यातरी पायावर पडते म्हणजेच, ऑक्सिजनच

आकाश कवेत घेताना... (अवकाश निरीक्षणाच्या इतिहासावर ओझरती नजर)

Image
सहज काल रात्री आकाशाकडे  लक्ष गेले असता  मनात विचार आला... २००९ साली ' आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र वर्ष ' साजरे केले परंतु अजूनही आपणास या या कधी निळेभोर तर कधी काळ्याकुट्ट कधी लालसर छटा पसरलेल्या तर कधी चमचम करणाऱ्या चांदण्यांनी सुशोभित होणाऱ्या अश्या अवकाशाची नेमकी व अद्ययावत स्वरूपाची  माहिती नाही ही खंत मनात वाटली. जॅने टेलर यांनी लिहिलेली, "Twinkle twinkle little star, How I wonder what you are, up above the world so high, like a diamond in the sky" या कवितेच्या ओळी सहज ओठांवर आल्या. खरंच आकाशातील चंद्र चंद्र सूर्य आणि चांदण्यांची विलोभनीय मांडणी  आदिम काळापासून मानवाला भूल पाडत आली आहे, असा विचारही मनात आला.  मानवाला प्राचीन काळापासून खुणावणाऱ्या आकाशाचे, आकाशातील घटनांची शास्त्रीय दृष्टिकोनातून निरीक्षणे करणे कधी सुरू झाले हा प्रश्न मनात आला आणि या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले खरेतर ही निरीक्षणे केव्हा सुरू झाली हे निश्चितपणे सांगता येणे शक्य नाही, पण सर्वात प्राचीन वेधशाळा म्हणावी अशी जागा इंग्लंडमध्ये 'सॅलिसबरी' च्या टेकडीवर आहे असे

वैज्ञानिक पद्धतीने संशोधन करणे म्हणजे नक्की काय?

Image
वैज्ञानिक पद्धती : निरीक्षण, प्रयोग, परीक्षण व सामान्यीकरण याद्वारे ज्ञानाची बांधणी म्हणजे वैज्ञानिक पद्धती होय. अल्हाझेन या वैज्ञानिकाने ११ व्या शतकात  भौतिक प्रयोगाद्वारे सिद्ध केले की, "जी वस्तू आपल्या डोळ्यांना दिसते, तेथून प्रकाश सरळ रेषेत आपल्या डोळ्यात प्रवास करतो." हा वैज्ञानिक पद्धतीने प्रथम काढलेला निष्कर्ष आहे. या कल्पनेच्या आधारावर फ्रँकिस बेकन यांनी इ.स. १६२० मध्ये वैज्ञानिक पद्धतीचा पाया घातला. संशोधन : नैसर्गिक शास्त्रात किंवा सामाजिक शास्त्रात घडणाऱ्या घटनांचे स्पष्टीकरण व त्या घटनांना नियमन करणारी तथ्य यांच्याविषयी सामान्य नियम शोधण्यासाठी केलेला पद्धतशीर प्रायोगिक प्रयत्न म्हणजे संशोधन होय. ज्ञान म्हणजे उत्तर जाणून घेणे किंवा समस्येवर उपाय सुचवणे. उपयोजन म्हणजे ज्ञानाद्वारे जाणून घेतलेल्या उपायांची अंमलबजावणी करणे वैज्ञानिक पद्धतीचे सामान्यतः सहा ते सात टप्पे असतात. १. समस्या सूत्रन : 'असे का' याचे उत्तर माहीत नसेल तर त्या गोष्टीला समस्या म्हणतात. उदा. शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी आहे, ही विशिष्ट समस्या निश्चित केली. २. माहिती (तथ्य) संकलन