Posts

Showing posts with the label पुस्तकांची दुनिया World of Books

संन्याशासारखा विचार करा या जय शेट्टी यांच्या पुस्तकची प्रस्तावना; Introduction : Think Like a Monk by Jay Shetty (Marathi)

Image
 'संन्याश्यासारखा विचार करा' या पुस्तकाची प्रस्तावना  तुम्हाला नवीन कल्पना हवी असेल, तर जुने पुस्तक वाचा. (इव्हान पावलॉव) मी अठरा वर्षांचा होतो आणि लंडनमधील कास बिझनेस स्कूल या महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिकत होतो, त्या वेळी माझ्या एका मित्राने मला त्याच्याबरोबर एका संन्याशाचं व्याख्यान ऐकायला येण्यास सांगितलं. मी विरोध केला. ‘एखाद्या संन्याशाचं व्याख्यान ऐकायला मी का जावं?’ महाविद्यालयाच्या परिसरात मी नेहमीच सीईओंना, प्रसिद्ध व्यक्तींना आणि इतर यशस्वी लोकांना व्याख्याने देताना पाहत होतो; पण मला एखाद्या संन्याशामध्ये बिलकूल स्वारस्य नव्हतं. ज्या लोकांनी प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात काही गोष्टी मिळवलेल्या आहेत, अशा वक्त्यांचं व्याख्यान ऐकण्यास मी प्राधान्य देत होतो.  माझ्या मित्राने आग्रहच धरला आणि अखेरीस मी म्हणालो, ‘जर त्यानंतर आपण बारमध्ये जाणार असलो तरच मी येईन.’ ‘प्रेमात पडणं’ हा वाक्प्रचार जवळजवळ नेहमीच अगदी निर्णायकपणे शृंगारिक नातेसंबंधांचं वर्णन करण्यासाठी वापरला जातो; पण त्या रात्री मी त्या संन्याशाला त्याचे अनुभव सांगताना ऐकलं आणि मी त्याच्या प्रेमातच पडलो. व्य...

जेव्हा जगण्याची दिशा हरवली आहे असं वाटू लागतं, तेव्हा खंबीर मार्गदर्शक बनणाऱ्या 'संन्याशासारखा विचार करा' पुस्तकाविषयी काही... Think Like a Monk - Jay Shetty (Marathi)

Image
(अमेझॉनवर पुस्तक खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.) 'संन्याशासारखा विचार करा' पुस्तकाविषयी काही... जय शेट्टी यांच्या पुस्तकामध्ये संन्याशाची मनोरचना स्वीकारण्याचे तीन टप्पे सांगितले आहेत. पहिला टप्पा हा आपल्याला मागे खेचणाऱ्या बाह्य प्रभावांपासून, अंतर्गत अडथळ्यांपासून आणि भीतींपासून आपली सुटका करून घेणं म्हणजेच त्या गोष्टी सोडून देणं हा असतो. याला आपण ‘सोडून द्या’. किंवा ‘जाऊ द्या’ असं म्हणतो. वाढीसाठी जागा मिळवण्याकरिता करावयाची साफसफाई म्हणून आपण याचा विचार करू शकतो. ‘आपली वाढ कशी होत राहील', हा दुसरा टप्पा असतो. तुम्हाला हेतू, उद्दिष्ट आणि आत्मविश्वास यांच्यासह निर्णय घेणं शक्य व्हावं, यासाठी तुमच्या आयुष्याची पुन्हा नव्याने जडणघडण करण्यास या टप्प्याची तुम्हाला मदत होईल. आपल्या पलीकडचं जग पाहून, आपल्या मनातील कृतज्ञतेची भावना व्यापक बनवून आणि ती इतरांशी वाटून घेऊन, तसंच आपले नातेसंबंध अधिक सखोल, दृढ बनवून ‘आपण मुक्तहस्ते देऊया’ हा टप्पा येतो. आपल्याला लाभलेल्या देणग्या आणि प्रेम आपण इतरांशी वाटून घेतो आणि आपल्याला खऱ्या आनंदाचा...

१० विज्ञानविषयक पुस्तके (मराठीतून) जी तुम्ही वाचायलाच हवीत!! 10 Science Books in Marathi you must read!!

असं म्हणतात की, ग्रंथाच्या लेखकाशी संवाद साधावयाचा असेल तर तो ग्रंथ वाचा. सामान्यतः लोकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक जगामध्ये पुस्तकाचं स्थान कमी-जास्त प्रमाणात असतं. शैक्षणिक पुस्तकं आपल्या आयुष्याचा मोठा भाग असतात आणि वैज्ञानिक पुस्तकं आपलं आयुष्य अधिक आधुनिक करण्यासाठी रामबाण उपाय असतो.आपण  मागील ब्लॉग मध्ये आकाश निरीक्षण छंद जोपासणे याविषयी बोललो.  रात्रीचा छंद जोपासला रात्र तर छान गेली, दिवसा मस्तपैकी एखादे पुस्तक वाचले तर आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटेल. मग ती पुस्तके कोणती? चला तर बोलूया आज विज्ञान पुस्तकावर.... १. किमयागार : अच्युत गोडबोले  पदार्थविज्ञान, जीवशास्त्र, भूगर्भशास्त्र, रसायनशास्त्र, वगैरेंना ज्यांनी आद्य शास्त्राचा दर्जा प्राप्त करून दिला, त्या महान शास्त्रज्ञांचा संघर्ष अत्यंत रोचक व सुलभ भाषेत लेखकाने सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याचा सर्वोत्कृष्ट प्रयत्न केला आहे     २. चार नगरातील माझे विश्व : जयंत विष्णू नारळीकर  सुमारे साडेपाचशे पानांचे हे पुस्तक जयंत नारळीकर यांचे आत्मचरित्र आहे. त्यांना 'साहित्य अकादमीचा पुरस...