Posts

Showing posts from May, 2020

ताण-तणावाचा सामना करण्यासाठीचे ७ परिणामकारक उपाय / 7 Effective Ways to Face the Stress

Image
ताण-तणावापासून मुक्तता Relief from stress धकाधकीच्या जीवनात आपण विविध समस्यांना सामोरे जात असतो, तेव्हा मनामध्ये बैचेनी निर्माण होते, यामुळे अर्थातच मानसिक आरोग्य खालावते. सध्या नैराश्य व ताणतणाव हेच सर्वाधिक आरोग्याला घातक आहेत. ताण मेंदूवर वाईट परिणाम करतो, त्यामुळे आपण मानसिकरित्या आजारी पडतो, त्यामुळे आपल्या जैविक संतुलनावर परिणाम होतो. इतर व्यक्तीमुळे ताण निर्माण होतो,अशी  ताणाविषयी सर्व सामान्य व्यक्तींची पूर्व मते आहेत, परंतु बऱ्याच मानसशास्त्रज्ञांनी मांडलेल्या विचारा नंतर ताण हा प्रत्येक वेळी हानिकारकच असतो असे नाही किंबहुना, * कोणत्याही बदलाला दिली जाणारी प्रतिक्रिया म्हणजे  ताण होय. *  'ताणा'शिवाय जीवन शक्यच नाही, परंतु अति-ताण किंवा दीर्घकालीन ताण अपायकारकच असतो असे संशोधनाचे जनक 'हान्स सॅली'  यांनी सांगितले. १९३५ मध्ये  सॅली यांनी सिद्धांत मांडला, यानुसार ताण हा कोणत्याही आजाराचे प्रमुख कारण असून दीर्घकालीन ताणामुळे दूरगामी रासायनिक बदल घडून येतात.याच्या पुढील अवस्था आहेत. तणावस सामोरे जातानाच्या तीन अवस्था : हान्स सॅलीचा सिद्धांत

जैवविविधतेचे संवर्धन करण्याचे ६ फायदे, 6 benefits of Conserving Biodiversity

Image
२२ मे रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन साजरा केला जातो. याचा उद्देश जैवविविधतेच्या संवर्धन करण्यासाठी जागृती करणे आहे. २०२० मध्ये या दिनाचा विषय आहे : मानवाच्या समस्यांचे उपाय निसर्गात आहेत.   जैवविविधता म्हणजे विविध प्राणी आणि वनस्पती यांची 1. प्रजाती दरम्यान असणारी जनुकीय विविधता  2. दोन वेगवेगळ्या प्रजातींमध्ये असणारी विविधता तसेच 3. वस्तीस्थानातील व परिसंस्थेतील यांच्यातील विविधता होय.   प्रत्येक प्राणी व वनस्पती यांना जगण्यासाठी आवश्यक अन्न व संसाधने निसर्गात उपलब्ध असतात, तसेच होणारे रोग व जखमा नैसर्गिकरित्या बऱ्या करण्याची क्षमता निसर्गात असते. पर्यावरणातील जैवविविधता मानवजातीला अनेक सेवा पुरवत असते. १. मृदेचे संवर्धन व पोषक द्रव्यांचे पुनर्वापर :  मृदेतून वनस्पतींना पाणी व पोषकद्रवे मिळतात व त्यातून अन्ननिर्मिती होते. जमिनीत असलेल्या विविध सूक्ष्मजीव हे जमिनीतील पोषक द्रव्यांचा वनस्पतीला वापरता येतील अशा प्रकारात रूपांतर करून अन निर्मितीस मदत करतात तसेच जमिनीची सुपीकता टिकवण्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो परंतु अलीकडे होणाऱ्या अति रासा

३ कारणे ज्यामुळे पाण्याची वाफ अनेक डब्यांची ट्रेन ओढू शकते!! What Makes A Steam Locomotive Work?

Image
पाणी हे जीवन आहे. पण पाण्यामध्ये असे काय आहे त्यामुळे पाणी हे सजीवसृष्टीचा आधार आहे? १६ व्या शतकात ज्ञानाच्या पुनरुत्थान होत असताना, मानव तर्कशुद्ध व वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करू लागला. निसर्गातील कुतूहलांचे उत्तर निरीक्षणाने व जीवनातील समस्यांचे निराकरण वैज्ञानिक पद्धतीनने प्रयोग करून करू लागला. उष्णतेचा वापर करून यांत्रिक कार्य करणे शक्य झाले ते वाफेच्या इंजिनमुळे.१८व्या शतकामध्ये त्यातूनच औद्योगिक क्रांती झाली. उष्णतेचा वापर करून यांत्रिक कार्य करणे शक्य झाले ते वाफेच्या इंजिनमुळे. स्वयंपाक करताना प्रेशर कुकरचा वापर अन्नपदार्थ शिजवण्यासाठी करतात . यामध्ये पाणी जेव्हा उच्च दाबाखाली पाण्याचा उत्कलनांक वाढतो, त्यामुळे पदार्थ लवकर शिजतो. याच पाण्याचा वाफेचा उपयोग वाफेचे इंजिन चालवण्यासाठी केले जातो. परंतु वाफेत एवढी ताकद येते कुठून की जी अनेक डब्यांची रेल्वे ओढू शकते?   १. पाण्याचे तापमान १०० डिग्री झाल्यावर पाण्याची लगेच वाफ का होत नाही? : अप्रकट ऊष्मा २.  पाण्याच्या रेणूंमध्ये असणाऱ्या सुप्त ऊर्जेचे रहस्य : हैड्रोजन बंध ३. जेव्हा वाफ पाण्याप्रमाणे वाहू लागत

१० विज्ञानविषयक पुस्तके (मराठीतून) जी तुम्ही वाचायलाच हवीत!! 10 Science Books in Marathi you must read!!

असं म्हणतात की, ग्रंथाच्या लेखकाशी संवाद साधावयाचा असेल तर तो ग्रंथ वाचा. सामान्यतः लोकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक जगामध्ये पुस्तकाचं स्थान कमी-जास्त प्रमाणात असतं. शैक्षणिक पुस्तकं आपल्या आयुष्याचा मोठा भाग असतात आणि वैज्ञानिक पुस्तकं आपलं आयुष्य अधिक आधुनिक करण्यासाठी रामबाण उपाय असतो.आपण  मागील ब्लॉग मध्ये आकाश निरीक्षण छंद जोपासणे याविषयी बोललो.  रात्रीचा छंद जोपासला रात्र तर छान गेली, दिवसा मस्तपैकी एखादे पुस्तक वाचले तर आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटेल. मग ती पुस्तके कोणती? चला तर बोलूया आज विज्ञान पुस्तकावर.... १. किमयागार : अच्युत गोडबोले  पदार्थविज्ञान, जीवशास्त्र, भूगर्भशास्त्र, रसायनशास्त्र, वगैरेंना ज्यांनी आद्य शास्त्राचा दर्जा प्राप्त करून दिला, त्या महान शास्त्रज्ञांचा संघर्ष अत्यंत रोचक व सुलभ भाषेत लेखकाने सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याचा सर्वोत्कृष्ट प्रयत्न केला आहे     २. चार नगरातील माझे विश्व : जयंत विष्णू नारळीकर  सुमारे साडेपाचशे पानांचे हे पुस्तक जयंत नारळीकर यांचे आत्मचरित्र आहे. त्यांना 'साहित्य अकादमीचा पुरस्कार' मिळाला आहे. नित

रात्रीच्या आकाशात एवढ्या साऱ्या ताऱ्यांमध्ये आपल्या सूर्यमालेतील आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसणारे ५ ग्रह कसे ओळखायचे?(How to Identify Planets of our Solar System in Night sky?)

Image
रात्रीच्या आकाशात एवढ्या साऱ्या ताऱ्यांमध्ये आपल्या सूर्यमालेतील आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसणारे ५ ग्रह कसे ओळखायचे? (How to Identify Planets of our Solar System in Night sky?)  सध्या कोरोना च्या भीतीने सर्वजनच आपापला quarantine time आपापल्या घरात बसून घालवत आहेत...दिवसरात्र tv, mobile ,लॅपटॉप पुढे बसून स्क्रीन time वाढवण्यापेक्षा एक नवीन छंद ...अवकाश दर्शन ... विरंगुळा म्हणून आपण जडवून घेऊ शकतो.रोज आकाश आपल्याला खुणावत असते...आपण गच्चीवर झोपून पण मोबाईल कडे लक्ष देतो त्यामुळे त्या दुनियेतील मौज आपण अनुभवू शकत नाही. आकाशात चांदोबा, उल्का,चांदण्या,ग्रह विविध नक्षत्रे,सप्तर्षी इत्यादी विविध गोष्टींची रेलचेल असते.यातील बऱ्याच गोष्टी आपण कोणत्याही तिकीटशिवाय,विना अन्य  साधन याशिवाय पाहू शकतो.होय अगदी सत्य आहे,मंगळ, बुध, गुरू, शुक्र,शनी,चांदोबा ,नक्षत्रे,सप्तर्षी या गोष्टी आपण उघड डोळ्यांनी पाहू शकतो.पण एक समस्या आहे ती म्हणजे आपण सगळे ग्रह एकाच वेळी नाही पाहू शकत,कारण त्याच्या कक्षेवरून त्यांची वेळ,काळ, स्थळ ठरत असते.. आता अवकाश दर्शन कसे करावे ते पाहू... ग्रह व तारे मधील  स

Online Lectures शाप की वरदान?

Image
'न हि ज्ञाने सदृशं पवित्रमिह विद्यते' अर्थात ज्ञानासारखी पवित्र गोष्ट जगात कोणतीही नाही, असं आजही ज्ञानाबद्दल बोलले  जाते.आजच्या विज्ञान युगाला तंत्रज्ञानाची जोड  न दिल्यास  आधुनिक  युगाची अयोग्य व्याख्या केल्यासारखे  आहे .विविध शाळा,महाविद्यालये,विद्यापीठे यांमध्ये एक नवीनच पद्धत उदयास आली आहे.आपण त्याचा  online classes, virtual classes, flipped classes किंवा उत्प्रेक्षी वर्ग या गोंडस नावाने गौरव करतो. या तंत्रज्ञानाचे फायदे :आज विज्ञान तंत्रज्ञानामूळे सर्व ज्ञान बोटांच्या साहाय्याने अगदी चुटकीसरशी क्षणार्धात  मिळते. या तंत्रज्ञानाचा वापर आजची  शिक्षणप्रणाली विकसित करण्यासाठी केला जातो आहे.यामध्ये आपली कामगिरी उत्तम व्हावी यासाठी दिलेले प्रशिक्षण असते.Online classes हि पद्धती आज खूप लोकप्रिय झाली आहे.या  उत्प्रेक्षी वर्ग संकल्पनेत  आपल्याला इंटरनेट ,LCD/संगणक  या उपकरणांद्वारे एक शिक्षक व विदयार्थ्यांना उत्साहपूर्वक एका जागी खिळून ठेवण्याची सोय दिलेली असते.आजच्या प्रगत  काळात गुरुकुल मधील पारंपारिक शिक्षणाबरोबरच  आजच्या online classes ची जोड देणे अत्यावश्यक ठरले आहे.

सूर्य पृथ्वीभोवती फिरतो की पृथ्वी सूर्याभोवती फिरते ? Earth revolves around the Sun or Sun revolves around the Earth?

Image
पृथ्वीसापेक्ष सूर्य ग्रह व इतर तार्‍यांची गती 1. पृथ्वीवर सगळ्या गोष्टी स्थिर असतात. आपण पृथ्वीवर वावरताना आपल्याला पृथ्वी फिरताना अजिबात दिसत नाही. यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की पृथ्वी स्थिर आहे. परंतु जेव्हा आपण चालू बसमध्ये बसलेलो असतो, तेव्हा आपल्याला आपण, आपल्या सोबतच्या वस्तू तसेच सहप्रवासी स्थिर दिसतात, परंतु या सर्वांची गती ही बसच्या गती एवढी असते. यावरून असे सिद्ध होते की आपली पृथ्वीसापेक्ष गती ही शून्य आहे. त्यामुळे आपल्याला पृथ्वी स्थिर दिसते. (Relative motion is zero) 2. सूर्य, चंद्र व तारे यांचे उगवणे व मावळणे सूर्य सकाळी पूर्वेला उगवतो आणि संध्याकाळी पश्चिमेला मावळतो तसेच चंद्र आणि आकाशातील तारे ही पूर्वेला उगवून पश्चिमेला मावळतात. यावरून असा निष्कर्ष काढू शकतो की सूर्य, चंद्र व तारे पृथ्वीभोवती फिरताहेत. परंतु सोळाव्या शतकात कोपर्निकस या पोलिश अवकाश निरीक्षकाने काही गोष्टी दाखवून दिल्या की काही ग्रह ठराविक वेळी ठराविक दिशेला दिसतात. सूर्य मावळताना आकाशात दिसणाऱ्या गुरू व शुक्र हे ग्रह उगवत व मावळत नाहीत तर अवकाशात विशिष्ट वर्तुळाकार पद्धतीत फिर

चला, पृथ्वीचा परीघ मोजूया!! Let's measure Circumference of Earth!!

Image
याचे उत्तर "हो" असे आहे. पृथ्वी गोल आहे असे प्रथम पायथागोरस यांनी सांगितले. अक्षवृत्त व रेखावृत्त या संज्ञा 'इराॅटोस्टेनिस' याने मांडल्या. आधुनिक पद्धतीने पृथ्वीचा परीघ मोजण्याच्या अनेक पद्धती आहेत, परंतु २२०० वर्षापूर्वी इ.स.पू. २०० मध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी जमिनीला लंबरूप धातूचा गजच्या सावल्यांचा उपयोग करून ग्रीक संशोधक इराॅटोस्टेनिस भूगोलशास्त्रज्ञाने पृथ्वीचा परीघ मोजण्याचा पहिला प्रयत्न केला.  २१ मार्च रोजी सूर्य कर्कवृत्तावर असतो, त्यावेळी स्वेनेट शहरावर सूर्य बरोबर डोक्यावर येतो त्यावेळी तेथे एक धातूचा गज लंब पद्धतीने उभा केली की की तिची ची सावली पडत नाही म्हणजेच तेथे शून्य सावली असते त्याच वेळी स्वेनेट शहरापासून आठशे किलोमीटर दूर साधारणपणे तेच रेखावृत्तीय स्थान असणारे परंतु वेगळे अक्षवृत्तीय स्थान असणारे शहर अलेक्झांड्रिया येथे जमिनीला लंबरूप असणाऱ्या धातूच्या गजाने सूर्याच्या शीर्षबिंदूशी 7.2 अंश कोन केला होता. हे अंशीय फरक स्थान म्हणजेच त्या दोन ठिकाणातील अक्षांश यातील फरक होता पृथ्वी गोल आहे त्यामुळे पृथ्वीचे अंशीय माप 360 अंश आहे.   7.