Online Lectures शाप की वरदान?
'न हि ज्ञाने सदृशं पवित्रमिह विद्यते' अर्थात ज्ञानासारखी पवित्र गोष्ट जगात कोणतीही नाही, असं आजही ज्ञानाबद्दल बोलले जाते.आजच्या विज्ञान युगाला तंत्रज्ञानाची जोड न दिल्यास आधुनिक युगाची अयोग्य व्याख्या केल्यासारखे आहे .विविध शाळा,महाविद्यालये,विद्यापीठे यांमध्ये एक नवीनच पद्धत उदयास आली आहे.आपण त्याचा online classes, virtual classes, flipped classes किंवा उत्प्रेक्षी वर्ग या गोंडस नावाने गौरव करतो. या तंत्रज्ञानाचे फायदे :आज विज्ञान तंत्रज्ञानामूळे सर्व ज्ञान बोटांच्या साहाय्याने अगदी चुटकीसरशी क्षणार्धात मिळते. या तंत्रज्ञानाचा वापर आजची शिक्षणप्रणाली विकसित करण्यासाठी केला जातो आहे.यामध्ये आपली कामगिरी उत्तम व्हावी यासाठी दिलेले प्रशिक्षण असते.Online classes हि पद्धती आज खूप लोकप्रिय झाली आहे.या उत्प्रेक्षी वर्ग संकल्पनेत आपल्याला इंटरनेट ,LCD/संगणक या उपकरणांद्वारे एक शिक्षक व विदयार्थ्यांना उत्साहपूर्वक एका जागी खिळून ठेवण्याची सोय दिलेली असते.आजच्या प्रगत काळात गुरुकुल मधील पारंपारिक शिक्षणाबरोबरच...