वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय?

वैज्ञानिक पद्धती : निरीक्षण, प्रयोग, परीक्षण व सामान्यीकरण याद्वारे ज्ञानाची बांधणी म्हणजे वैज्ञानिक पद्धती होय.


अल्हाझेन या वैज्ञानिकाने ११ व्या शतकात 

भौतिक प्रयोगाद्वारे सिद्ध केले की,

"जी वस्तू आपल्या डोळ्यांना दिसते, तेथून प्रकाश सरळ रेषेत आपल्या डोळ्यात प्रवास करतो." हा वैज्ञानिक पद्धतीने प्रथम काढलेला निष्कर्ष आहे. या कल्पनेच्या आधारावर फ्रँकिस बेकन यांनी इ.स. १६२० मध्ये वैज्ञानिक पद्धतीचा पाया घातला.



संशोधन: नैसर्गिक शास्त्रात किंवा सामाजिक शास्त्रात घडणाऱ्या घटनांचे स्पष्टीकरण व त्या घटनांना नियमन करणारी तथ्य यांच्याविषयी सामान्य नियम शोधण्यासाठी केलेला पद्धतशीर प्रायोगिक प्रयत्न म्हणजे संशोधन होय.

ज्ञान म्हणजे उत्तर जाणून घेणे किंवा समस्येवर उपाय सुचवणे.

उपयोजन म्हणजे ज्ञानाद्वारे जाणून घेतलेल्या उपायांची अंमलबजावणी करणे


वैज्ञानिक पद्धतीचे सामान्यतः सहा ते सात टप्पे असतात.


१. समस्या सूत्रन :

'असे का' याचे उत्तर माहीत नसेल तर त्या गोष्टीला समस्या म्हणतात.

उदा. शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी आहे, ही विशिष्ट समस्या निश्चित केली.


२. माहिती (तथ्य) संकलन : 

समस्या संबंधी माहिती देणाऱ्या वस्तुनिष्ठ गोष्टी यासंबंधी नोंदी घेणे.

उदा. गैरहजर व हजर विद्यार्थ्यांची आर्थिक व सामाजिक पार्श्वभूमीसंबधी तथ्यात्मक माहिती संकलन


३. वर्गीकरण व विश्लेषण :

अत्यवस्थ विखुरलेली माहिती साम्य व भेद यासारखे गुणधर्म समजावून घेऊन त्यांचे वर्ग पाडणे याला वर्गीकरण म्हणतात.

विश्लेषण : तथ्यांचे वर्गीकरण आतून तिच्याशी गुंतलेले विविध घटक वेगवेगळे करून समजावून घेणे.

उदा. उत्पन्न, वर्ग इ गुणधर्मानुसार माहितीचे वर्गीकरण केले.


 गृहीतक तयार करणे : 

समस्यांच्या कारणांचा निरीक्षण आधारित तात्पुरता अंदाज किंवा स्पष्टीकरण करणे म्हणजे गृहीतक होय.

उदा. वर्गीकरणावरून गैरहजेरिमागे गरिबी हे कारण असू शकते असे गृहीतक मानले.


५. गृहीतकाचे परीक्षण :

गृहीतक खरे मानून त्यापासून निगामी पद्धतीने निष्कर्ष काढला जातो व त्या निष्कर्ष या प्रमाणे वस्तुस्थिती आहे का पाहिले जाते, म्हणजेत गृहीत धरलेली शक्यता पडताळणी म्हणजेच गृहीतकाचे परीक्षण होय.

उदा. श्रीमंत विद्यार्थी गैरहजर असतात का, त्याचे प्रमाण इ गोष्टींचे परीक्षण करून इतर गृहीतके खरी मानून ती परिस्तिथी व गृहितकाचा विरोधाभास सिद्ध केलं की ते गृहीतक खोटे ठरते.


६. गृहीतकाची सिद्धता :

गृहितकला पर्यायी गृहितके असू शकतात. परीक्षणामध्ये योग्य स्पष्टीकरण दिले जाते. सिद्धता म्हणजे घटनेचे समाधानकारक स्पष्टीकरण देणारे कोणतीतरी एकच गृहितक बरोबर आहे हे दाखवले जाते.

उदा. इतर गृहीतके रद्दबातल झाल्यावर आपण गृहीत धरलेल्या गृहितकाचा प्रयोग व निरीक्षण यांच्या माहितीच्या विश्लेषणाच्या आधारे गृहीतक सिद्ध करतो.


७. सामान्यीकरण :

सामान्यीकरण यामध्ये सामान्य नियम बनवले जातात. विशिष्ट परिस्थितीत जो अनुभव आला तोच अनुभव समान परिस्थितीत सर्वत्र येईल असे विधान करणे म्हणजे सामान्यीकरण होय.

उदा. जगात शाळेतील मुलांच्या गैरहजेरीसाठी गरिबी हे एक मुख्य कारण आहे.

Comments

ह्या पोस्ट नक्की वाचा.

जैवविविधतेचे संवर्धन करण्याचे ६ फायदे, 6 benefits of Conserving Biodiversity

१० विज्ञानविषयक पुस्तके (मराठीतून) जी तुम्ही वाचायलाच हवीत!! 10 Science Books in Marathi you must read!!

सूर्य पृथ्वीभोवती फिरतो की पृथ्वी सूर्याभोवती फिरते ? Earth revolves around the Sun or Sun revolves around the Earth?

आयुका :IUCAA ,पुणे

संन्याशासारखा विचार करा या जय शेट्टी यांच्या पुस्तकची प्रस्तावना; Introduction : Think Like a Monk by Jay Shetty (Marathi)