आयुका :IUCAA ,पुणे

२८फेब्रुवारी १९२८ रोजी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ 'चंद्रशेखर व्यंकट रमण' यांनी 'रमण परिणाम'चा शोध लावला व त्यांना  या शोधा निमित्त 'नोबेल' पारितोषिक प्राप्त झाले आणि या दिवसाचे औचित्य साधून २८फेब्रुवारी हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा करतात. त्या दिवशी सर्वांसाठी ज्ञान विज्ञाचा अमूल्य खजाना खुला करण्यासाठी सुसज्ज  असते आपल्या जयंत नारळीकर सरांची 'आयुका'.
 पुणे विद्यापीठाच्या आवारात एक संशोधन संस्था 'आयुका' नावाने सुप्रसिद्ध तसेच अत्यंत लोकप्रिय आहे.१९८८ मध्ये जागतिक  दर्जाची ख्याती असणारे  खगोलशास्त्रज्ञ 'जयंत नारळीकर' यांनी अजित केंभावी व नरेश दधीच यांच्यासोबत आयुकाची स्थापना केली. विज्ञान प्रेमींना आपला विज्ञान दिवस अविस्मरणीय घालवायचा असेल तर पुण्यातील आयुका सारखे उत्तम ठिकाण दुसरे नसेल. विद्यापीठातील प्रवेशद्वारापासून पायी चालत जाताना विद्यापीठातील भुलभुलय्या ठरलेले रस्ते जरा वेळ घेत असत, पण आता तीही समस्या गायब झाली आहे.जवळच इको-फ्रेंडली बस येते व विद्यापीठांमध्ये हवे त्या  ठिकाणी सोडते, ते ही अगदी विनामूल्य. विज्ञान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल  येथे असते...सर्वजणच गडबडीत धावपळीत असतात व तितकेच उत्साही असतात आपला राष्ट्रीय महोत्सव साजरा करण्यासाठी.एरवी निसर्गाच्या मधुर संगीत सोडता शुकशुकाट व शांतता पूर्ण आयुका आज बाल चमू लहान थोरांच्या गजबजाटाने भरून गेलेली असते. आयुका मध्ये जाताना  प्रवेशद्वाराच्या भिंतीजवळ मोठा 'लोगो दिसतो'

याचा अर्थ असा की, जग हे अमर्याद, अनंत आहे. जमिनीवर पाय घट्ट रोवून अवकाशाचा वेध कसा घेता येतो हे आपल्याला जयंत नारळीकरांनी आयुका द्वारे सांगितले आहे.
आयुकातील इमारती:
खरे तर अवाढव्य परिसर असून ही गडबड गोंधळ उडण्याचे काही कारणच नाही ,कारण जागोजागी नकाशे बसवलेले असतात.
 १. शास्त्रज्ञ कॉलनी:
 येथे विविध कार्यनिमित्त येणारे शास्त्रज्ञ, संशोधक विद्यार्थी,प्राध्यापक किंवा इतर staff यांच्यासाठी असणारी निवासस्थाने आहेत.
 आयुकाच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच डावीकडे शास्त्रज्ञांना राहण्यासाठी आहे व
२.प्रमुख चौक:या चौकामध्ये निसर्गरम्य वातावरण  असून त्यापुढे विविध ऑडिटोरियम आहेत या.चौकामध्ये चार शास्त्रज्ञांचे पुतळे आहेत यामध्ये न्यूटन,गॅलिलिओ, आइन्स्टाईन व आर्यभट्ट हे चारही बाजूंना आहे. विज्ञान दिना दिवशी थोरामोठ्यांचा पासून ते अगदी बाल विद्यार्थीसर्वांची गर्दी येथे या शास्त्रज्ञांविषयी माहिती ऐकण्यासाठी उत्सुक असते. 



यांच्याबद्दल असणारे विविध शंका ,प्रश्न विचारण्यासाठी विद्यार्थी या चौकाच्या कठड्यावर बसलेले असतात व त्यांना उत्तर देणारे आयुका मधील प्रशिक्षित लोकही असतात. शास्त्रज्ञांच्या कॉलनीत शास्त्रज्ञांच्या कॉलनीच्या खाली एक दोलक
 दिसतो तो 'फोकल्ट पेंड्यूलम':
या पेंडुलम मुळे आपली पृथ्वी वर्तुळाकार फिरते हे आपल्याला समजते.
डोम:
खरे तर डोम हे दुर्बिणी ठेवून आकाश निरीक्षण करण्यासाठी केलेल्या असतात पण आयुकाचा निर्मितीकार चार्ल्स कोर याने आपला हट्ट सोडला नाही.या डोम मधुन हि आकाशनिरीक्षण करता येते. तसेच खाली आयुका ची प्रतिकृती ही ठेवलेली आहे. 


वराहमिहीर व ब्रह्मगुप्त:

चौकाच्या उत्तर दिशेला वराहमिहिर नावाचे ग्रंथालय आहे. या ग्रंथालयांमध्ये खगोलशास्त्राशी संबंधित विविध प्रकारची पुस्तके, ग्रंथ,  नियतकालिके, मासिके, पाक्षिके भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. ग्रंथालयात जाताना वाचक ग्रंथसंपदेच्या जवळ जाऊन पोचतो परंतु येताना त्याला कमानीतून बाहेर यावे लागते. समजा कोणी वाचकांनी एखादे पुस्तक स्वतःजवळ बाळगल्यास त्या कमानीतून एक आवाज येतो. अर्थातच ग्रंथालयाला एवढी सुरक्षितता देणारे भारतातील हे पहिले ग्रंथालय आहे.
 तिथेच ब्रह्मगुप्त नावाची इमारत असून ते एक संगणक केंद्र व उपकरणांची प्रयोगशाळा आहे.
 चंद्रशेखर प्रेक्षागृह:
 या इमारतीच्या बाहेर पडल्यास समोरच चंद्रशेखर प्रेक्षागृह आहे. सुमारे ५०० लोक मावतील तेवढे हे प्रेक्षागृह आहे. विज्ञान दिनाच्या कार्यक्रमा दिवशी या प्रेक्षागृहा मध्ये 'आस्क सायंटिस्ट' हा कार्यक्रम होतो त्यावेळी जयंत नारळीकर व आयुका चे डायरेकटर यांच्यासोबत मुले  व मोठी विज्ञानप्रेमी माणसे आपले विविध प्रश्न पत्रांद्वारे सादर करतात व जयंत नारळीकर आणि  बरोबर उपस्थित असणारे विविध शास्त्रज्ञ त्यांना सुलभरीत्या उत्तरे देतात. 

मुक्तांगण विज्ञान शोधिका:

चंद्रशेखर प्रेक्षागारा शेजारीच 'मुक्तांगण विज्ञान शोधिका' आहे. खरे तर ही उभारण्यासाठी पु ल देशपांडे व सुनीता देशपांडे यांनी फार मोलाचे सहकार्य केले आहे. या मुक्तांगण विज्ञान शोध इमारतीला सूर्य मानून सूर्य माले प्रमाणे विविध आकाराचे गोल दगड ठेवले आहेत.याचबरोबर धुमकेतू विविध ग्रहांचे उपग्रह हि आठवणीने दाखवले आहेत 

सायन्स पार्क: विज्ञान दिना दिवशी या सायन्स पार्क मध्ये विविध भित्तीपत्रिका प्रदर्शन, सायन्स टॉईज प्रदर्शन भरलेले असते. या बरोबरच सायन्स पार्क मधील विशेष आकर्षण केंद्र म्हणजे सम्राट यंत्र या यंत्रामुळे आपल्याला प्रमाणित वेळ समजून घेता येते.
याचबरोबर विज्ञान झोका,विज्ञान पट्टा, एकीकडून बोलल्यावर दुसऱ्या अंतरावर असणारा लोखंडी चकती त्यातून येणारा आवाज,चंद्र,मंगळ यांच्या प्रतिकृती यांसारख्या विविध गोष्टींचा समावेश सायन्स पार्क मध्ये होतो.

 आयुकाच्या आवारामध्ये खगोलशास्त्राशी संबंधित असणाऱ्या विविध अद्ययावत विषयांवर भित्तीपत्रिका द्वारे विज्ञान प्रसाराचे कार्य होतच असते आणि सर्वांनी ते ऐकावे याकरिता एक छोटीशी युक्ती आयुकाने आयोजित केलेली असते. तेथे असणारी सर्व व्याख्याने ऐकून त्यांनी दिलेल्या कार्डवर त्या त्या व्याख्यान ऐकल्यानंतर चे शिक्के मारून घेणे व सर्व झाल्यानंतर जेथून आपण कार्ड घेतले आहे तेथे जमा करणे. यानंतर आपल्याला आयुका पारितोषक म्हणून आकाशगंगा व गिरवली ची दोन छायाचित्रे देते.
 दिवसभर आता कार्यक्रमांमध्ये सर्वांना प्रवेश असतो यामध्ये 'सर्वसमावेशक खगोलशास्त्र' या कार्यक्रमाचा देखील समावेश करण्यात आला आहे. येथे विविध प्रकारच्या विशेष मुला-मुलींना खगोलशास्त्राचे धडे दिले जातात. वेगवेगळ्या सभागृहांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची व्याख्याने, प्रात्यक्षिके यांसारखे विविध कार्यक्रम दिवसभर सर्वांसाठी विनामूल्य खुले असतात. विविध प्रकारची वैज्ञानिक उपकरणे, मॉडेल्स येथे पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते आणि आपला विज्ञान दिन नंबर वन झाला असे उद्गार आपल्या तोंडातून बाहेर पडतात. विज्ञान दिनकार्यक्रम फक्त एवढ्यातच संपत नाही, तर रात्रीसुद्धा विज्ञान प्रेमींसाठी मेजवानीच असते.
आकाशदर्शन:
 रात्री आपल्याला विनामूल्य आकाश दर्शन व त्यासंबंधीचे मार्गदर्शन हादेखील कार्यक्रम आयोजित केलेला असतो.
आकाशात घडणाऱ्या घडामोडी,असणाऱ्या तारका समूहाचे स्थान व ते कसे ओळखावे याबद्दल खूप सुंदर मार्गदर्शन केले जाते.
तसेच त्या त्या वर्षातील नोबेल परितोषक विजेत्या वर एक व्याख्यान आयोजित केले जाते.

निघताना आपला अभिप्राय देणे आयुका  नम्रपणे व आपल्याकडून जास्तीजास्त दर्जेदार गोष्टीद्वारे जास्तीत जास्त विज्ञान सर्वांपर्यंत पोचवण्याचा आटोकाट व अविरत प्रयत्न करते. 
अत्यंत मोजक्या भाषेत आयुका येथील विज्ञान दिनाचे वर्णन केले आहे तरी कृपया सर्वांनी या दिवशी विज्ञान संस्था आयुकास  जरूर भेट द्यावी.

Comments

ह्या पोस्ट नक्की वाचा.

जैवविविधतेचे संवर्धन करण्याचे ६ फायदे, 6 benefits of Conserving Biodiversity

१० विज्ञानविषयक पुस्तके (मराठीतून) जी तुम्ही वाचायलाच हवीत!! 10 Science Books in Marathi you must read!!

सूर्य पृथ्वीभोवती फिरतो की पृथ्वी सूर्याभोवती फिरते ? Earth revolves around the Sun or Sun revolves around the Earth?

संन्याशासारखा विचार करा या जय शेट्टी यांच्या पुस्तकची प्रस्तावना; Introduction : Think Like a Monk by Jay Shetty (Marathi)