चला, बीजगोळ्यांच्या साहाय्याने झाडे लावूया... Let's plant trees with the help of seedballs...

चला, बीजगोळ्यांच्या साहाय्याने झाडे लावूया ... बीजगोळे seedballs स्वीडनमधील अवघ्या १७ वर्षांची 'ग्रेटा थर्नबर्ग' हिने ढासळणाऱ्या पर्यावरणाचा जाब जगाला विचारला. बीजमाता पद्मश्री पुरस्कार प्राप्त 'राहीबाई पोपरे' यांनी विविध प्रकारच्या बीजांचे संवर्धन केले. तर आपण निसर्ग संवर्धनासाठी आपला खारीचा वाटा नक्कीच देऊ शकतो नाही का? पावसाळ्यात पावसाचे शुभ संदेश बरोबर पर्यावरण उपयुक्त एक सुंदर उपक्रम आपणासमोर सादर करताना अत्यानंद होतो आहे. आज तो मौका भी है और दस्तूर भी... मान्सूनपूर्वी या उपक्रमाबद्दल जाणून घेऊया, जेणेकरून हा उपक्रम अंमलात आणण्यास सुलभता येईल. १. बीजगोळे पद्धती म्हणजे काय? बीज गोळे म्हणजे विविध बिया चिखला मध्ये टाकून त्यांचे चेंडूच्या आकाराचे बनवलेले गोळे होत. २. बीजगोळे विखरण पद्धती : जंगल हटवून अधिवास नष्ट करणं व विषाणूला आपल्याजवळ करणं. हे टाळण्याचा महामंत्र म्हणजे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन... वृक्षरोपणासाठी हवी ती रोपटी त्यावेळेस मुबलक प्रमाणात मिळत नाही. यावर जालीम उपाय बीजगोळे बनवणे होय. ३. बीजगोळे कसे बनवावेत...