चला, बीजगोळ्यांच्या साहाय्याने झाडे लावूया... Let's plant trees with the help of seedballs...

चला, बीजगोळ्यांच्या साहाय्याने झाडे लावूया ...
बीजगोळे seedballs
बीजगोळे seedballs

स्वीडनमधील अवघ्या १७ वर्षांची 'ग्रेटा थर्नबर्ग' हिने ढासळणाऱ्या पर्यावरणाचा जाब जगाला विचारला. बीजमाता पद्मश्री पुरस्कार प्राप्त 'राहीबाई पोपरे' यांनी विविध प्रकारच्या बीजांचे संवर्धन केले. तर आपण निसर्ग संवर्धनासाठी आपला खारीचा वाटा नक्कीच देऊ शकतो नाही का? पावसाळ्यात पावसाचे शुभ संदेश बरोबर पर्यावरण उपयुक्त एक सुंदर उपक्रम आपणासमोर सादर करताना अत्यानंद होतो आहे. आज तो मौका भी है और दस्तूर भी... मान्सूनपूर्वी या उपक्रमाबद्दल जाणून घेऊया, जेणेकरून हा उपक्रम अंमलात आणण्यास सुलभता येईल.

१. बीजगोळे पद्धती म्हणजे काय? 
 बीज गोळे म्हणजे विविध बिया चिखला मध्ये टाकून त्यांचे चेंडूच्या आकाराचे बनवलेले गोळे होत.

२. बीजगोळे विखरण पद्धती :
जंगल हटवून अधिवास नष्ट करणं व विषाणूला आपल्याजवळ करणं. हे  टाळण्याचा महामंत्र म्हणजे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन... वृक्षरोपणासाठी हवी  ती रोपटी त्यावेळेस मुबलक प्रमाणात मिळत नाही. यावर जालीम उपाय  बीजगोळे बनवणे होय.

३. बीजगोळे कसे बनवावेत?
  खरेतर पोस्टाची तिकिटे, नाणी यांचा संग्रह करण्याचा छंद असतो त्याप्रमाणे आपण खाल्लेल्या विविध फळांच्या बियांचा संग्रह करण्याचा छंद प्रत्येकास जडणे गरजेचे आहे. या बिया संग्रहामध्ये (सीड बँक) मध्ये आपण साठवू शकतो. प्रथमतः खाल्लेल्या फळांच्या बिया स्वच्छ करून त्या उन्हात वाळवून घ्याव्या. बीजगोळे बनवताना लागणारी माती सुपीक असावी, पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते त्यामुळे ते बीजगोळे पाण्याविना जास्त काळ त्यामध्ये असणाऱ्या बीजास ओलावा पुरवू शकतात. एक बीज घेऊन मातीचा छोट्या आकाराचा गोळा तयार करावा. असे सगळे गोळे करून झाले की किमान एक दिवस तरी ते खोलीमध्ये सुकवण्यासाठी ठेवावेत.

४. बीजगोळे विखुरण्यासाठी जागेची निवड:
डोंगर, उजाड माळरान, रिकाम्या जागा, जंगलक्षेत्र, शेताचे बांध, राखीव क्षेत्र, वनराया, नदीचे काठ, बंधारे इत्यादी ठिकाणी बीजगोळे विखुरणे योग्य राहील. 

५. बीजगोळे विखुरण्याचा योग्य कालावधी:
पावसाळा सुरू झाला की पावसाळा संपेपर्यंत आपण केव्हाही हा कार्यक्रम उरकून घेऊ शकतो. 
 ६. बीजगोळे बनवण्यासाठी बीजाची निवड:
  खरेतर कोणत्याही वृक्षाचा मानवाला कल्पनेच्या सीमेपलीकडील फायदा होतो. आपण आपल्याला उपयुक्त व पर्यावरणाचा समतोल राखतील अशा वनस्पतींचे बीजगोळे तयार करू शकतो. यामध्ये चिंच, कडूलिंब, बोरी, जांभूळ, फणस, आंबा इ. यांसारखी देशी झाडांच्या बीजाचा वापर यासाठी करू शकतो. विशेषतः सावली व ऑक्सिजन देणारे वृक्ष तयार व्हावेत हा यामागचा उद्देश आहे.

थंड हवा, ढगाळ आकाश ,धुक्यात डोंगर, मातीचा गंध, कडक चहा चिंब भिजायला तयार राहा ... पावसाचा शुभेच्छा नातेवाईकांना समाज माध्यमांद्वारे पाठवण्यापेक्षा या समाज माध्यमांचा उपयोग पर्यावरण संवर्धन उपक्रम राबवण्यासाठी करून घ्या.
सध्याच्या टाळेबंदीने आपल्याला काय शिकवले याचा विचार करू लागल्यास निसर्गाचं सुधारलेला रूप पाहण्यास मिळाले. पर्यावरणाचा योग्य समतोल राखण्यासाठी आवश्यक त्या नियमावलीचे रेखाटन निसर्गाने केले आहे. परंतु त्या नियमांची पूर्तता करण्यात केली तर निसर्ग सर्वांसाठी नियम आहेत, मानव जातीची चुकांची निसर्ग गय करत नाही. हा धडा आपल्याला कोरोना साथीमुळे मिळतो. मानव यातून धडा घेऊन भावी पिढीसाठी सुदृढ पर्यावरणाची सोय करणार का? असा प्रश्न उपस्थित राहतो. विविध महामारीसारख्या समस्या या आज प्रथमच घडत नाही, या आधीही अशा घटना घडल्या आहेत, परंतु आज ज्या प्रमाणात पर्यावरणाची हानी झालेली आहे, त्या प्रमाणात साथीचा धोका वाढला आहे. 
मानवाने निसर्गाप्रती आस्था, सजग वृत्ती, जागरुकता, कृतज्ञता, व्यक्त करण्याचे गुण अजूनही सुप्त अवस्थेतच आहेत. निसर्गाच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यास 'बैल गेला न झोपा केला' अशी परिस्थिती ओढावेल. यातून आपण शिकून भविष्याचे नियोजन करतानाही शाश्वत व सर्वसमावेशक मार्गांचा विचार करावयास हवा. पर्यावरण संवर्धन उपक्रम राबवण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करूया.

विज्ञानवाटेवर चालूया ...
vidnyanwata.blogspot.com
fb.com/vidnyanwata
instagram.com/vidnyanwata1
t.me/vidnyanwata
Whatsapp 8788406543

Comments

ह्या पोस्ट नक्की वाचा.

जैवविविधतेचे संवर्धन करण्याचे ६ फायदे, 6 benefits of Conserving Biodiversity

१० विज्ञानविषयक पुस्तके (मराठीतून) जी तुम्ही वाचायलाच हवीत!! 10 Science Books in Marathi you must read!!

सूर्य पृथ्वीभोवती फिरतो की पृथ्वी सूर्याभोवती फिरते ? Earth revolves around the Sun or Sun revolves around the Earth?

आयुका :IUCAA ,पुणे

संन्याशासारखा विचार करा या जय शेट्टी यांच्या पुस्तकची प्रस्तावना; Introduction : Think Like a Monk by Jay Shetty (Marathi)