रात्रीच्या आकाशात एवढ्या साऱ्या ताऱ्यांमध्ये आपल्या सूर्यमालेतील आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसणारे ५ ग्रह कसे ओळखायचे?(How to Identify Planets of our Solar System in Night sky?)

रात्रीच्या आकाशात एवढ्या साऱ्या ताऱ्यांमध्ये आपल्या सूर्यमालेतील आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसणारे ५ ग्रह कसे ओळखायचे?
(How to Identify Planets of our Solar System in Night sky?)



 सध्या कोरोना च्या भीतीने सर्वजनच आपापला quarantine time आपापल्या घरात बसून घालवत आहेत...दिवसरात्र tv, mobile ,लॅपटॉप पुढे बसून स्क्रीन time वाढवण्यापेक्षा एक नवीन छंद ...अवकाश दर्शन ... विरंगुळा म्हणून आपण जडवून घेऊ शकतो.रोज आकाश आपल्याला खुणावत असते...आपण गच्चीवर झोपून पण मोबाईल कडे लक्ष देतो त्यामुळे त्या दुनियेतील मौज आपण अनुभवू शकत नाही.
आकाशात चांदोबा, उल्का,चांदण्या,ग्रह विविध नक्षत्रे,सप्तर्षी इत्यादी विविध गोष्टींची रेलचेल असते.यातील बऱ्याच गोष्टी आपण कोणत्याही तिकीटशिवाय,विना अन्य  साधन याशिवाय पाहू शकतो.होय अगदी सत्य आहे,मंगळ, बुध, गुरू, शुक्र,शनी,चांदोबा ,नक्षत्रे,सप्तर्षी या गोष्टी आपण उघड डोळ्यांनी पाहू शकतो.पण एक समस्या आहे ती म्हणजे आपण सगळे ग्रह एकाच वेळी नाही पाहू शकत,कारण त्याच्या कक्षेवरून त्यांची वेळ,काळ, स्थळ ठरत असते..
आता अवकाश दर्शन कसे करावे ते पाहू...

ग्रह व तारे मधील  सर्वात मूलभूत फरक :(Difference between Planets and Star)

एक म्हणजे ग्रह ताऱ्यांपेक्षा तेजवी दिसतात. याचे श्रेय जाते ते आपल्या सुर्यालाच..त्याच्या प्रखर तेजाचे परावर्तन आपले ग्रह करत असतात.त्यांना स्वतःचा प्रकाश नसतो.दुसरे कारण म्हणजे ते ताऱ्यांपेक्षा अंतराने पृथ्वीच्या जवळ आहेत.
तारे लुकलुकतात,ग्रह नाहीत.

अजून एक मह्त्वाची गोष्ट प्रत्येक ग्रह सूर्याचा प्रकाश वेगवेगळ्या प्रकारे परावर्तित करतो.
१.मंगळ: लालसर ठिपका असल्यासारखा
२.बुध:प्रखर पिवळा
३.गुरु: सर्वात तेजस्वी पांढरा
४.शुक्र: चंदेरी (गडद)
५.शनी: पिवळसर पांढरा
काहीवेळा त्या प्रदेशातील प्रदूषणामूळे वर दिलेल्या रंगापेक्षा वेगळे रंग पण दिसण्याची शक्यता असू शकते.मात्र निरभ्र अवकाशात हे झिलमिल सितारे पाहण्याचे सुख काही औरच असते.
यानंतरच पुढील प्रश्न-

अवकाशात कोणता ग्रह कोणत्या दिशेला व कोणत्या वेळी असतो ?
(Position of planets)

१.बुध: हा ग्रह सूर्याच्या जवळचा ग्रह आहे.सूर्योदयाच्या थोडेसे अगोदर बुध ग्रह दिसतो...आपण निद्राधीन असाल तरीही काळजी करण्याचे कारण नाही सूर्य मावळल्यानंतर काही मिनिटे पुढे अगदी क्षितिजावर  दिसतो.

२.शुक्र सुद्धा आपण बुधाप्रमाणे पाहू शकतो. शुक्र जास्त तेजस्वी दिसतो.

३.मंगळाला पाहण्यासाठी मात्र रात्री उशिरपर्यंत  जागरण करावे लागते.रात्री उशिरा पासून ते पहाटे ५ते५:३०पर्यंत आपण तो सहज पाहू शकतो.मात्र याची दिशा प्रत्येक महिन्यात बदलते.

४.गुरु व शनी: मंगळ ग्रहाप्रमाणे आपण पाहू शकतो...चला तर मग आकाशदर्शनाचा छंद जडवूया...आकाशासोबतचे नाते जपुया.


Comments

ह्या पोस्ट नक्की वाचा.

जैवविविधतेचे संवर्धन करण्याचे ६ फायदे, 6 benefits of Conserving Biodiversity

१० विज्ञानविषयक पुस्तके (मराठीतून) जी तुम्ही वाचायलाच हवीत!! 10 Science Books in Marathi you must read!!

सूर्य पृथ्वीभोवती फिरतो की पृथ्वी सूर्याभोवती फिरते ? Earth revolves around the Sun or Sun revolves around the Earth?

आयुका :IUCAA ,पुणे

संन्याशासारखा विचार करा या जय शेट्टी यांच्या पुस्तकची प्रस्तावना; Introduction : Think Like a Monk by Jay Shetty (Marathi)