जैवविविधतेचे संवर्धन करण्याचे ६ फायदे, 6 benefits of Conserving Biodiversity

२२ मे रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन साजरा केला जातो. याचा उद्देश जैवविविधतेच्या संवर्धन करण्यासाठी जागृती करणे आहे. २०२० मध्ये या दिनाचा विषय आहे : मानवाच्या समस्यांचे उपाय निसर्गात आहेत. 

जैवविविधता म्हणजे विविध प्राणी आणि वनस्पती यांची
1. प्रजाती दरम्यान असणारी जनुकीय विविधता 
2. दोन वेगवेगळ्या प्रजातींमध्ये असणारी विविधता तसेच
3. वस्तीस्थानातील व परिसंस्थेतील यांच्यातील विविधता होय.

  प्रत्येक प्राणी व वनस्पती यांना जगण्यासाठी आवश्यक अन्न व संसाधने निसर्गात उपलब्ध असतात, तसेच होणारे रोग व जखमा नैसर्गिकरित्या बऱ्या करण्याची क्षमता निसर्गात असते. पर्यावरणातील जैवविविधता मानवजातीला अनेक सेवा पुरवत असते.

१. मृदेचे संवर्धन व पोषक द्रव्यांचे पुनर्वापर : 

मृदेतून वनस्पतींना पाणी व पोषकद्रवे मिळतात व त्यातून अन्ननिर्मिती होते. जमिनीत असलेल्या विविध सूक्ष्मजीव हे जमिनीतील पोषक द्रव्यांचा वनस्पतीला वापरता येतील अशा प्रकारात रूपांतर करून अन निर्मितीस मदत करतात तसेच जमिनीची सुपीकता टिकवण्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो परंतु अलीकडे होणाऱ्या अति रासायनिक खतांचा वापर कीटकनाशकांचा वापर यामुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे, त्यामुळे मातीचे परीक्षण करून आवश्यक रसायनांचा वापर करणे रास्त ठरते.

२. स्वच्छ व खेळती हवा :
 प्राण्यांच्या श्वसन क्रियेतून बाहेर पडणारा कार्बन डाय-ऑक्साइड हा वनस्पती द्वारे शोषला जातो तसेच प्प्रकाश संश्लेषणातून तयार झालेला ऑक्सिजन प्राण्याद्वारे वापरला जातो. अशा प्रकारे हवामानाचा समतोल साधला आहे त्यामुळे वनस्पतींचे रक्षण करणे म्हणजे स्वतःचे रक्षण केल्याप्रमाणेच आहे.

३. अन्न, पाणी व औषधे :
 आपल्या आवश्यक अन्नाची गरज विविध पिके, भाज्या व फळझाडे येऊन भागवली जाते, जलचक्रातून विविध स्रोतात आलेले पाण्याचे जातं व संवर्धन जैवविविधतेच्या माध्यमातून होते. महात्मा गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे एक व्यक्ती एक गुंठा जमिनीवर स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतो. पर्यावरणस्नेही ही जीवनशैली आत्मसात करून आपण जैवविविधतेचे रक्षण करू शकतो. सेंद्रिय खाद्य अन्न व विविध नैसर्गिक आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर करून निरोगी व आनंदी जीवन व्यतीत करू शकतो.

४. नैसर्गिक व सांस्कृतिक मूल्ये :
 आपले विविध सण हे विशिष्ट विविध ऋतूतील नैसर्गिक घटनांची संबंधित असतात, तसेच त्यावेळी केले जाणारे खाद्यपदार्थ हे त्या शरीराला असणाऱ्या गरजांना अनुरूप असतात. निसर्ग हा स्वतःच्या गतीत चालत असतो, तो माणसाला परिस्थितीनुरूप स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवण्यासाठी प्रेरणा देतो. त्यातूनच निसर्ग आपल्याला जगण्याची मूल्ये शिकवतो.

५. पर्यटन व संशोधन :

जैवविविधतेचे महत्त्व पाहता अनेक जैवविविधतेचे रक्षण करणारे राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये, जीवावरण राखीव क्षेत्रे व संरक्षित जंगले याचा उपयोग पर्यटनासाठी करता येतो. निसर्गतच्या सानिध्यात आल्यावर मानवाच्या शरीराची व मनाची पुनर्भरणाचे क्रिया अधिक गतीने होऊन, मन प्रसन्न होते व शरीराला ऊर्जा प्राप्त होते. अशी ठिकाणे जैवविविधतेचा अभ्यास संशोधन करणाऱ्यासाठी उपयुक्त ठरतात.

 ६.  स्वतःचे अस्तिव टिकवणे :

जैवविविधतेचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे स्वतःचे अस्तित्व टिकवणे होय. कोणताही प्राणी किंवा वनस्पती हा विशिष्ट वातावरणात वस्तीस्थानात राहू शकतो. त्यामध्ये होणारे बदल जुळवून घेण्यासाठी जनुकीय बदल होणे आवश्यक असते, परंतु ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. त्यामुळे अस्तित्व टिकवण्यासाठी विविध जातींचे एकमेकांवरील अवलंबित्व हे अपरिहार्य आहे. जर एखादी प्रजाती नष्ट झाली तर अन्नजाळे असो अप्रत्यक्ष फायदे-तोटे या साखळ्या तुटल्या जातात. त्यामुळे अस्तित्व टिकवणे अवघड होऊन अनेक प्रजाती नामशेष होतात. त्यामुळे मानवजातीचे अस्तित्व टिकवण्यासाठी जैवविविधतेचे संवर्धन करणे आवश्यक आहे.

शाश्वत विकास व पर्यावरण : 

मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गाची पुनर्भरणाची क्षमता कमी होत चालली आहे. काहींच्या सजातींचे आपल्याशी असलेले संबंध प्रत्यक्ष असतो तर काहींचा अप्रत्यक्ष. तसेच काहींचा आपल्याला आर्थिक फायदा असतो, काहींचा तोटा असतो तर काहींचा कोणताच परिणाम होत नाही. निसर्गातील प्रत्येक घटकाचे स्थान हे  कोणतीतरी कार्य करण्यासाठीच असते. उदारणार्थ, मातीतील गांडूळांच्या मानवाला प्रत्यक्ष कोणताच फायदा नाही, परंतु जमीन सुपीक करून तो आपल्याला अन्न मिळवून देण्यासाठी अप्रत्यक्ष मदत करतो. त्यामुळे पर्यावरणाशी छेडछाड करताना त्याचा सर्वकष अभ्यास करून पर्यावरणाचा समतोल राखून, शाश्वत विकास होईल एवढाच हस्तक्षेप करणे गरजेचे आहे.

जैवविविधतेबद्दलची माहिती कशी वाटली ती कमेंट्स करून सांगा. तुम्हाला या संकल्पनेबद्दल अधिक माहिती असेल किंवा दिलेल्या माहितीत सुधारणा करायची असेल तसेच कोणते प्रश्न असतील तरीही कमेंट्स करा. चर्चेतून अनेक संकल्पना स्पष्ट होऊ शकतात.

Comments

ह्या पोस्ट नक्की वाचा.

१० विज्ञानविषयक पुस्तके (मराठीतून) जी तुम्ही वाचायलाच हवीत!! 10 Science Books in Marathi you must read!!

सूर्य पृथ्वीभोवती फिरतो की पृथ्वी सूर्याभोवती फिरते ? Earth revolves around the Sun or Sun revolves around the Earth?

आयुका :IUCAA ,पुणे

संन्याशासारखा विचार करा या जय शेट्टी यांच्या पुस्तकची प्रस्तावना; Introduction : Think Like a Monk by Jay Shetty (Marathi)