जेव्हा जगण्याची दिशा हरवली आहे असं वाटू लागतं, तेव्हा खंबीर मार्गदर्शक बनणाऱ्या 'संन्याशासारखा विचार करा' पुस्तकाविषयी काही... Think Like a Monk - Jay Shetty (Marathi)

Think Like a Monk - Jay Shetty (Marathi)


(अमेझॉनवर पुस्तक खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.)

'संन्याशासारखा विचार करा' पुस्तकाविषयी काही...

जय शेट्टी यांच्या पुस्तकामध्ये संन्याशाची मनोरचना स्वीकारण्याचे तीन टप्पे सांगितले आहेत.

पहिला टप्पा हा आपल्याला मागे खेचणाऱ्या बाह्य प्रभावांपासून, अंतर्गत अडथळ्यांपासून आणि भीतींपासून आपली सुटका करून घेणं म्हणजेच त्या गोष्टी सोडून देणं हा असतो. याला आपण ‘सोडून द्या’. किंवा ‘जाऊ द्या’ असं म्हणतो.

वाढीसाठी जागा मिळवण्याकरिता करावयाची साफसफाई म्हणून आपण याचा विचार करू शकतो. ‘आपली वाढ कशी होत राहील', हा दुसरा टप्पा असतो. तुम्हाला हेतू, उद्दिष्ट आणि आत्मविश्वास यांच्यासह निर्णय घेणं शक्य व्हावं, यासाठी तुमच्या आयुष्याची पुन्हा नव्याने जडणघडण करण्यास या टप्प्याची तुम्हाला मदत होईल.

आपल्या पलीकडचं जग पाहून, आपल्या मनातील कृतज्ञतेची भावना व्यापक बनवून आणि ती इतरांशी वाटून घेऊन, तसंच आपले नातेसंबंध अधिक सखोल, दृढ बनवून ‘आपण मुक्तहस्ते देऊया’ हा टप्पा येतो. आपल्याला लाभलेल्या देणग्या आणि प्रेम आपण इतरांशी वाटून घेतो आणि आपल्याला खऱ्या आनंदाचा शोध लागतो. सेवेमुळे होणाऱ्या लाभांनी आपण आश्चर्यचकित होतो.

अनुक्रमणिका

भाग एक - सोडून द्या 
(ध्यान : श्वसनक्रिया)

१ ओळख -
(माझ्याविषयी मी जसा विचार करतो तसाच मी आहे)
२ नकारात्मकता -
(दुष्ट राजा उपाशी राहतो)
३ भीती -
(हॉटेल पृथ्वीमध्ये स्वागत असो)
४ संकल्प -
(सोन्याने दीपून गेलेली नजर)

भाग दोन - विकास करून घ्या 
(ध्यान : कल्पनाचित्र नजरेसमोर आणणं)

५ हेतू
(विंचवाचा स्वभाव)
६ दिनक्रम
(स्थळाकडे ऊर्जा असते, काळाकडे स्मृती असते)
७ मन
(सारथ्याची द्विधा मनःस्थिती)
८ अहंकार
(शक्य असेल तर मला पकडून दाखवाच)

भाग तीन - द्या
(ध्यान : मंत्रपठण)

९ कृतज्ञता -
जगातील सर्वांत शक्तिशाली औषध 
१० नातेसंबंध -
लोक निरीक्षण करतात 
११ सेवा -
ज्या वृक्षांच्या सावलीत बसण्याचं तुमचं नियोजन नसेल, त्यांची लागवड करा
सामान्य माणसाचे मन विरुद्ध संन्याश्याचे मन

जय शेट्टी यांच्याविषयी काही ...

जय शेट्टी हा अशा एका घरात जन्मला होता की ज्या घरात डॉक्टर किंवा वकील झालं नाही तर तो अपयशी आहे असं समजलं जायचं. त्याने अपयशी होण्याचा मार्ग निवडला. त्याने एका नावाजलेल्या बिझनेस स्कूल पदवी घेतल्यानंतर सूट बूट घालण्याऐवजी संन्याश्याचे कपडे परिधान केले. त्याने संन्याशी होण्याचं ठरवलं. कॉलेजमध्ये असताना गौरांग दास या संन्याशाचे (जो स्वतः आय आय टी मुंबईचा पदवीधर असून संन्याशी झाला होता) भाषण ऐकण्यासाठी गेला होता. कॉलेजनंतर तो भारतात आला आणि गौरांग दास याचे शिष्यत्व स्वीकारले. खरा साधक बनण्यासाठी चार ते आठ तास ध्यान करू लागला. तीन वर्षाच्या या संन्याशी जीवनानंतर त्याच्या गुरूंनी त्याला सांगितले की तू जो शहाणपण मिळवलं आहे आणि अनुभव घेतलाय हे जगात मुक्तहस्ताने वाट. 

तो पुन्हा लंडनला त्याच्या पालकांसोबत आल्यानंतर त्याला जाणवलं की मोठ्या कंपनीत काम करणारे, मोठ्या हुद्द्यावर काम करणारे त्याचे मित्र हे आनंदी-समाधानी नाहीत, ते सतत तणावाखाली वावरत आहेत. त्याने मित्रांसाठी काहीतरी करायचं ठरवलं. त्यातून त्याने समुपदेशनपर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. जय शेट्टी हा सोशल मीडियाचा सुपरस्टार झाला आहे. 'ऑन पर्पज'/ उद्देशावर हे  जगात क्रमांक १ चा ई-आकाशवाणी कार्यक्रम (पॉडकास्ट) आहे. 2017 मध्ये त्याचं नाव फोर्ब्स मासिकाच्या 'तिशीच्या आतले ३०' या यादीत आले होते. सोशल मीडियावर त्याचे 3.8 कोटी फॉलोअर्स आहेत. जो स्वतः एका साधूचे जीवन जगला आणि नंतर या जगात त्यांनी शिकलेले धडे समजावून सांगून जगात आणखी आनंद व शहाणपण एक अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी कार्य करत आहे.
जय शेट्टी यांचे 'संन्याशासारखा विचार करा' हे नवीन पुस्तक बाजारात आले आहे. 

माझा मित्र मला म्हणाला तू विज्ञानविषयक पुस्तके वाचतो, मग हे 'संन्याशासारखा विचार करा' हे पुस्तक कशाला वाचातोयस? मी काही न बोलता पुस्तकातील प्रस्तावनेतील पुढील परिच्छेद वाचायला दिला -

<< संन्याशांच्या शाळेतील माझा पहिला दिवस मला अगदी लख्ख आठवतो, मी नुकतंच मुंडन केलं होतं; पण तोपर्यंत मी कफनी घालत नव्हतो आणि तेव्हाही लंडनवरून आल्यासारखाच दिसत होतो. माझं लक्ष एका लहान वयाच्या संन्याशाकडे गेलं - त्याचं वय नक्कीच दहाहून जास्त नसावं, तो पाच वर्षांच्या मुलांच्या गटाला शिकवत होता. तो अतिशय प्रभावशाली होता. त्याच्याकडे प्रौढांसारखं आत्मसंयमन आणि आत्मविश्वास होता.

‘तू काय करतोयस?’ मी विचारलं.
‘आम्ही नुकताच त्यांना पहिला धडा शिकवून संपवला,’ तो म्हणाला आणि नंतर त्याने मला विचारलं, ‘शाळेत पहिल्या दिवशी तुम्ही काय शिकला होतात?’
‘मी अक्षरं आणि आकडे शिकण्यास सुरुवात केली होती. ते काय शिकले?’
‘श्वसन कसं करावं ही गोष्ट आम्ही त्यांना पहिल्यांदा शिकवतो.’
‘का?’ मी विचारलं.
‘कारण तुमच्या जन्मापासून ते तुमच्या मृत्यूपर्यंत तुमच्या सोबत तुमचा श्वास, तुमचं श्वसन हीच गोष्ट कायम असते. तुमचे सगळे मित्र, तुमचं कुटुंब, तुम्ही राहत असलेला तुमचा देश या सगळ्या गोष्टी बदलू शकतात; पण तुमच्यासोबत जी गोष्ट कायम राहते ते तुमचं श्वसन असतं.’

त्या दहा वर्षांच्या साधूने पुढे सांगितलं, ‘तुम्ही तणावात असता, त्या वेळी कशात बदल होतो? तुमच्या श्वसनात. तुम्ही संतप्त होता, त्या वेळी कशात बदल होतो? तुमच्या श्वसनात. श्वसनातील बदलासमवेतच आपण प्रत्येक भावनेचा अनुभव घेतो. ज्या वेळी तुम्ही आपल्या श्वसनावर नियंत्रण मिळवू शकता, त्याला दिशा देऊ शकता आणि त्याचं व्यवस्थापन करण्यास शिकता त्या वेळी तुम्ही आयुष्यातील कोणत्याही परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकता, तिला दिशा देऊ शकता.’ या संभाषणाच्या आधीपासूनच मला वृक्षाच्या पानावर किंवा समस्येच्या लक्षणांवर लक्ष केंद्रित करण्यास शिकवलं जात नव्हतं, तर गोष्टींच्या मुळावर लक्ष केंद्रित करण्यास शिकवलं जात होतं आणि एखादी व्यक्ती फक्त पाच किंवा दहा वर्षांचीच असली तरी कोणीही संन्यासी बनू शकतो ही गोष्ट मी थेट निरीक्षणाच्या माध्यमातून शिकत होतो. 

जन्म झाल्याबरोबर आपल्याला जी पहिली गोष्ट करावीच लागते ती असते श्वसन; पण जसजसं त्या नवजात अर्भकाच्या दृष्टीने आयुष्य अधिकाधिक गुंतागुंतीचं बनत जातं तसतसं निश्चल अवस्थेत बसून श्वसन करणं अतिशय आव्हानात्मक बनू शकतं. या पुस्तकातून तुम्हाला संन्याशाचा मार्ग दाखवला जाईल, अशी मला आशा आहे - आपण गोष्टींच्या मुळाशी जातो, आत्मपरीक्षणात सखोल शिरतो. या जिज्ञासेतून, चौकसपणातून, विचारांतून, परिश्रमातून आपण हे करत जातो आणि आपल्याला शांतता, नीरवता आणि हेतू सापडत असल्याची जाणीव होते. आश्रमातील माझ्या शिक्षकांनी दिलेल्या या विद्वत्तेचा वापर करून मी तुम्हाला त्या संदर्भात मार्गदर्शन करेन, अशी मला आशा आहे. >>

जसे विज्ञान, कला व खेळ शिकायला त्यातील सर्वोत्तम प्रशिक्षकाकडून प्रशिक्षण घेतो,  जीवनाचा उद्देश समजून घेऊन ते शांतता व समाधानाने जगण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी त्यातील सर्वोत्तम असलेल्याकडूनच शिकायला हवं!

या पुस्तकातील काही अर्थपूर्ण वाक्ये -

१. ज्या वेळी तुमचं सर्वाधिक अस्सल, खरं आयुष्य जगण्याचा तुम्ही प्रयत्न करता, त्या वेळी तुमचे काही नातेसंबंध धोक्यात येतात, ते गमावण्याची जोखीम तर सहन करण्याच्याही पलीकडची असते, तुमच्या आयुष्यात त्यांना तसंच ठेवण्याचा मार्ग शोधणं हे तुम्ही पत्करावं असं आव्हान असतं.

२. लक्ष विचलित करणाऱ्या कोणत्याही गोष्टी तिथे नव्हत्या. ज्या वेळी आमच्या सभोवतालच्या जगाची मतं, अपेक्षा आणि बंधने आमच्या कानांवर पडेनाशी झाली, त्या वेळी आम्ही स्वतःचं म्हणणं ऐकू लागलो.

३. मनाचा आजार : तुलना करणं, तक्रार करणं आणि टीका करणं’ असं आम्हाला शिकवलं होतं. वर्गात आम्ही दुसऱ्यांच्या खासगी गोष्टींची चवीने चर्चा करण्याच्या सवयीसह नकारात्मक विचाराच्या सवयींविषयी बोललो होतो. तिथे आम्ही केलेल्या एका स्वाध्यायात आपण केलेली किंवा विचार करत असलेली प्रत्येक टीका पडताळून पाहण्याचा समावेश होता. त्यापैकी प्रत्येक टीकेसाठी आम्हाला त्या व्यक्तीविषयी दहा चांगल्या गोष्टी लिहून काढाव्याच लागत होत्या.

आपण ज्या वेळी दुसऱ्यांवर टीका करतो, त्या वेळी आपल्यातील वाईट गोष्टीही आपल्याला अपरिहार्यपणे दिसतातच; पण ज्या वेळी आपण इतरांमधील चांगल्या गोष्टींचा शोध घेतो, त्या वेळी आपण आपल्यातील उत्तम गोष्टींकडे पाहू लागतो.

४. तुम्ही आतापर्यंत केलेल्या निवडींपैकी तीन उत्तम आणि तीन अत्यंत वाईट निवडींचा विचार करा. तुम्ही त्या का केल्या होत्या? तुम्ही त्यापासून काय शिकलात? त्या वेळी तुम्ही कशा प्रकारे वेगळ्या निवडी करू शकला असता?

संन्याश्यासारखा विचार करा या पुस्तकाची संपूर्ण 'प्रस्तावना' वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(अमेझॉनवर पुस्तक खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.)

Comments

Post a Comment

ह्या पोस्ट नक्की वाचा.

जैवविविधतेचे संवर्धन करण्याचे ६ फायदे, 6 benefits of Conserving Biodiversity

१० विज्ञानविषयक पुस्तके (मराठीतून) जी तुम्ही वाचायलाच हवीत!! 10 Science Books in Marathi you must read!!

सूर्य पृथ्वीभोवती फिरतो की पृथ्वी सूर्याभोवती फिरते ? Earth revolves around the Sun or Sun revolves around the Earth?

आयुका :IUCAA ,पुणे

संन्याशासारखा विचार करा या जय शेट्टी यांच्या पुस्तकची प्रस्तावना; Introduction : Think Like a Monk by Jay Shetty (Marathi)