चला, पृथ्वीचा परीघ मोजूया!! Let's measure Circumference of Earth!!

याचे उत्तर "हो" असे आहे. पृथ्वी गोल आहे असे प्रथम पायथागोरस यांनी सांगितले. अक्षवृत्त व रेखावृत्त या संज्ञा 'इराॅटोस्टेनिस' याने मांडल्या. आधुनिक पद्धतीने पृथ्वीचा परीघ मोजण्याच्या अनेक पद्धती आहेत, परंतु २२०० वर्षापूर्वी इ.स.पू. २०० मध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी जमिनीला लंबरूप धातूचा गजच्या सावल्यांचा उपयोग करून ग्रीक संशोधक इराॅटोस्टेनिस भूगोलशास्त्रज्ञाने पृथ्वीचा परीघ मोजण्याचा पहिला प्रयत्न केला.




 २१ मार्च रोजी सूर्य कर्कवृत्तावर असतो, त्यावेळी स्वेनेट शहरावर सूर्य बरोबर डोक्यावर येतो त्यावेळी तेथे एक धातूचा गज लंब पद्धतीने उभा केली की की तिची ची सावली पडत नाही म्हणजेच तेथे शून्य सावली असते त्याच वेळी स्वेनेट शहरापासून आठशे किलोमीटर दूर साधारणपणे तेच रेखावृत्तीय स्थान असणारे परंतु वेगळे अक्षवृत्तीय स्थान असणारे शहर अलेक्झांड्रिया येथे जमिनीला लंबरूप असणाऱ्या धातूच्या गजाने सूर्याच्या शीर्षबिंदूशी 7.2 अंश कोन केला होता. हे अंशीय फरक स्थान म्हणजेच त्या दोन ठिकाणातील अक्षांश यातील फरक होता पृथ्वी गोल आहे त्यामुळे पृथ्वीचे अंशीय माप 360 अंश आहे. 

 7. 2 degree = 800 km
 360 degree = 40,000 km
(आधुनिक पद्धतीने काढलेल्या मूल्याशी तुलना केल्यास 2% पेक्षा कमी त्रुटी)

अशा पद्धतीने पृथ्वीवरील एकाच रेखावृत्तावर असणाऱ्या परंतु वेगवेगळे अक्षवृत्तीय स्थान असणाऱ्या ठिकाणांच्या अक्षांश यातील फरक काढून पृथ्वीचा पाणी काढू शकतो उदाहरणार्थ पुणे (18.5° N, 73.8° E) आणि जयपुर (26.9° N, 75.7° E) या दोन ठिकाणातील हवाई अंतर १००० किलोमीटर आहे यावरून तुम्ही पृथ्वीचे परीघ मोजू शकता.

माहिती कशी वाटली ती कमेंट्स करून सांगा. तुम्हाला या संकल्पनेबद्दल अधिक माहिती असेल किंवा दिलेल्या माहितीत सुधारणा करायची असेल तसेच कोणते प्रश्न असतील तरीही कमेंट्स करा. अशाच विज्ञानविषयक माहिती मिळवण्यासाठी ब्लॉगला subscribe करा.





Comments

ह्या पोस्ट नक्की वाचा.

जैवविविधतेचे संवर्धन करण्याचे ६ फायदे, 6 benefits of Conserving Biodiversity

१० विज्ञानविषयक पुस्तके (मराठीतून) जी तुम्ही वाचायलाच हवीत!! 10 Science Books in Marathi you must read!!

सूर्य पृथ्वीभोवती फिरतो की पृथ्वी सूर्याभोवती फिरते ? Earth revolves around the Sun or Sun revolves around the Earth?

आयुका :IUCAA ,पुणे

संन्याशासारखा विचार करा या जय शेट्टी यांच्या पुस्तकची प्रस्तावना; Introduction : Think Like a Monk by Jay Shetty (Marathi)