आकाश कवेत घेताना... (अवकाश निरीक्षणाच्या इतिहासावर ओझरती नजर)


sky observation, आकाश निरीक्षण


सहज काल रात्री आकाशाकडे  लक्ष गेले असता  मनात विचार आला... २००९ साली 'आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र वर्ष' साजरे केले परंतु अजूनही आपणास या या कधी निळेभोर तर कधी काळ्याकुट्ट कधी लालसर छटा पसरलेल्या तर कधी चमचम करणाऱ्या चांदण्यांनी सुशोभित होणाऱ्या अश्या अवकाशाची नेमकी व अद्ययावत स्वरूपाची  माहिती नाही ही खंत मनात वाटली.

जॅने टेलर यांनी लिहिलेली,

"Twinkle twinkle little star,

How I wonder what you are,

up above the world so high,

like a diamond in the sky"

या कवितेच्या ओळी सहज ओठांवर आल्या. खरंच आकाशातील चंद्र चंद्र सूर्य आणि चांदण्यांची विलोभनीय मांडणी 

आदिम काळापासून मानवाला भूल पाडत आली आहे, असा विचारही मनात आला. 


मानवाला प्राचीन काळापासून खुणावणाऱ्या आकाशाचे, आकाशातील घटनांची शास्त्रीय दृष्टिकोनातून निरीक्षणे करणे कधी सुरू झाले हा प्रश्न मनात आला आणि या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले खरेतर ही निरीक्षणे केव्हा सुरू झाली हे निश्चितपणे सांगता येणे शक्य नाही, पण सर्वात प्राचीन वेधशाळा म्हणावी अशी जागा इंग्लंडमध्ये 'सॅलिसबरी' च्या टेकडीवर आहे असे मानतात. सुमारे ४८००० वर्षापूर्वींची ही वेधशाळा म्हणजे मोठे दगड रचून बनवलेल्या काही कमानी आणि त्याभोवती लहान दगडांची वर्तुळे आहेत. या मांडणीतून सूर्याचे उत्तरायण दक्षिणायन प्रामुख्याने समजून येते. या प्रकारची दगडांची वर्तुळे युरोपमध्ये अनेक ठिकाणी आढळतात. कोरियामध्ये चिमणीच्या आकाराची विटांच्या बांधकामाने बनलेली वेधशाळा ही प्राचीन कालखंड कालखंडामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे असे म्हटले जाते. पहिली बंदिस्त वेधशाळा हिला म्हणावे लागेल याची बसून खगोलाचे वेध घेतले जात असत. त्यानंतरच्या खगोल निरीक्षणामध्ये अरब देशांनी भरीव कामगिरी केलेली दिसून येते. 'समरकंद ' येथे तर खगोल विश्व विद्यालय होते. 'अल्-गोबी' या निरीक्षकाने सर्वप्रथम आकाशाचा चेंडूसारखा नकाशा तयार केला असे म्हणतात. त्याने त्या काळातील सरदार, राजे-महाराजे यांची नावे ताऱ्यांना दिली ती आजतागायत जगन्मान्य आहेत. तारे, चंद्र, सूर्य आणि ग्रहांच्या गतीचे गणिते याच काळी प्रथम मांडली गेली असे म्हटले जाते.अँस्ट्रोलेब हे उपकरण प्रचलित झाले ते याच काळात. 


भारतीयांमध्ये आर्यभटाच्या 'आर्यभटीय' मध्ये ग्रहगणिताचा, गोलीय गणिताचा ही खगोल शास्त्रासाठी चांगला उपयोग केलेला दिसतो. तसेच सूर्याभोवती पृथ्वी अधांतरी फिरते असाही उल्लेख आढळतो. त्याच्यानंतर वराहमिहीर,लल्लन यांनीही खगोल गणितावर  विचार केलेला दिसतो; पण प्रत्यक्ष निरीक्षणे घेण्याची वेधशाळा भारतात निर्माण झाली ती फारच अलीकडच्या काळात, १७३४ च्यादरम्यान राजा सवाई जयसिंग दुसरा याने बांधलेल्या या वेधशाळा भारतीय खगोलशास्त्रावर जशा आधारित होत्या तशाच त्या उघुलबेगच्या वेधशाळेच्या  सुधारित आवृत्त्या होत्या आणि समरकंद होऊन मागवलेल्या कारागिरांच्या  साहाय्याने बनवण्यात आल्या होत्या या वेधशाळा नुसत्या डोळ्यांनी आकाशाचे वेध घेण्यासाठी उपयोगात आणल्या जायच्या.


हँस लिप्परप्शिएच्या दुर्बिणीच्या शोधानंतर खगोल निरीक्षणात फार मोठे स्थित्यंतर आले ,परंतु या स्थित्यंतराचे श्रेय मात्र दिले जाते गॅलिलिओला. दुर्बिणीचा वापर आकाश निरीक्षणासाठी करून त्या निरीक्षणांचे टिपण शास्त्रोक्त करून ठेवणे गॅलिलिओने सुरू केले, या घटनेला आज चारशे वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने २००९ हे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र वर्ष म्हणून जाहीर झाले ते अगदी सार्थ आहे. खगोल विज्ञानातील गॅलिलिओ चे काम हर्षल, केसीनी सारख्या निरीक्षकांनी पुढे नेले.


इथे एक महत्त्वाची गोष्ट नमूद करावीशी वाटते की या खगोल विज्ञानात अनेक महिलांचाही सहभाग होता. आजही आकाशाचे वेध घेण्याच्या कामात ४०% महिलांचा सहभाग आहे. प्रकाशीय दुर्बिणी नंतर रेडिओ दुर्बिणी आल्या. अवरक्त,जंबूपार किरणांच्या आणि त्यानंतर गॅमा किरणांच्या साहाय्याने गेल्या शतकात आकाशाचे वेध घेणे सुरू झाले. अवकाशातील दुर्बिणी सोडल्या गेल्या भारतात सध्या कार्यरत असणाऱ्या अनेक वेधशाळा आहेत आपण नुकतेच 'चांद्रयान१' हे  चंद्राच्या जवळ निरीक्षणासाठी पाठवले आहे. त्याच्याकडून येणाऱ्या मधून माहिती मिळवण्याची आशा आहे. यामुळे अनभिज्ञ असणाऱ्या अवकाशाबद्दल बऱ्याच गोष्टींचा उलघडा आपल्याला होईल...


विज्ञानवाटेवर चालूया: 

चला तर मग अवकाश निरीक्षणा सोबत विज्ञान वाचनाची गोडी जपुया...आणि त्यातून मिळणाऱ्या ज्ञानाने उंचच उंच आकाश ठेंगणे करूया...

Comments

ह्या पोस्ट नक्की वाचा.

जैवविविधतेचे संवर्धन करण्याचे ६ फायदे, 6 benefits of Conserving Biodiversity

१० विज्ञानविषयक पुस्तके (मराठीतून) जी तुम्ही वाचायलाच हवीत!! 10 Science Books in Marathi you must read!!

सूर्य पृथ्वीभोवती फिरतो की पृथ्वी सूर्याभोवती फिरते ? Earth revolves around the Sun or Sun revolves around the Earth?

आयुका :IUCAA ,पुणे

संन्याशासारखा विचार करा या जय शेट्टी यांच्या पुस्तकची प्रस्तावना; Introduction : Think Like a Monk by Jay Shetty (Marathi)