पृथ्वीचे मानवाला पत्र (जागतिक ओझोन संरक्षण दिन)

 प्रिय मानवास,

 अनेक प्रेमपूर्ण आशीर्वाद ...

       मी सुरुवातीपासून स्वतःला खूप भाग्यवान समजते कारण,' जननी जन्मभूमिश्च स्वर्गदपी गरीयसी'   अशा अनमोल शब्दांमध्ये माझा गौरव केला गेला. माझ्या कुशीत जगणाऱ्या जीवसृष्टीच्या उभारणीमध्ये ऋषी, महर्षी, अध्यात्म शक्ती, व निसर्ग देवतेचा मोठा वाटा आहे. मी आदी-अनादी काळापासून लता,वेली यांनी बहरून गेले होते. तुझ्या सारख्या अनंत लेकरां बरोबर मी सुखासमाधानाने आयुष्याचा परमानंद घेत होते... पण, एक दिवस मला प्राण्या पक्षांच्या मधुर स्वरां ऐवजी जीवाचा आकांत ऐकु आला. यात वेदना व विरहाच्या संमिश्र भावना होत्या. दुःख दृश्य म्हणजे तुमचा एक बंधू धारदार  कुऱ्हाडीने माझ्या डेरेदार हिरव्या लेकरावर घाव घालून मातेपासून अलग करू पाहत होता. तेव्हाच ठरवलं, तुम्हाला योग्य तो धडा शिकवायचा.आई निष्ठूर होत नाही, ती मारते ते खून करण्यासाठी नसून आपल्या मुलांना योग्य संस्कार करणे हा त्यामागचा तिचा शुद्ध मानस असतो. आता सांगितलेला प्रसंग लहानपणापासून आपण ऐकला असेल. नंतर काय होते तर वृक्षतोड तुम्ही करत होता तेव्हा कुऱ्हाड तुमच्याच कोणाच्यातरी पायावर पडते म्हणजेच, ऑक्सिजनचे प्रमाण कमी होतं अर्थातच ओझोनच्या थरात घट होते व जगणही मुश्कील होतं. तुम्ही केलेल्या स्वैराचाराचा फटका सबंध जीवसृष्टीला सहन करावा लागतो. सहनशीलता नसणाऱ्या असंवेदनशील मनाच्या मानवा... तुम्हाला सर्वकाही इन्स्टंट हवं म्हणून आधुनिक जीवनशैली जगताना वापरलेली घरातील रेफ्रिजरेटर, एयर कंडीशनर यांसारखी यंत्रे यामुळे क्लोरोफ्ल्युओरोकार्बन या रसायनांमुळे माझ्या भोवती असणाऱ्या ओझोन रुपी कवचाला छिद्र पडले आहे, यामुळे सूर्यप्रकाशातील अतिनील प्रारणे माझ्यापर्यंत पोहोचतात व हवामानात बदल घडवून तुम्ही धोक्यात येता हे समजतंय न? मग समजून पण ना उमगल्या प्रमाणे वागणे कितपत योग्य आहे? पूर्व जन्मीची पुण्याई म्हणून काही सुपुत्रांनी १९९५ पासून आजच्या दिवशी ओझन संरक्षणासाठी काही करार केले ठरवून दिलेल्या २०१० व२०३०या कालमर्यादा पाळल्या गेल्या हे पाहून सुटकेचा श्वास सोडला आहे. एखादी भीषण स्थिती आल्याशिवाय आपण सावध होत नाही म्हणून परत एकदा लक्षात आणून देते की क्लोरीनचा अणू सरासरी एक लाख ओझोनच्या अणू ना नष्ट करतो तुम्ही केलेल्या प्रदूषणामुळे ओझोनला अकल्पनिय  असा धोका निर्माण झाला आहे.  अंटार्टिका ध्रुवावर ओझोन ल६०% व आर्कटीक ध्रुवावर ३०% ओझोनचे प्रमाण कमी होत आहे त्यामुळे तिथे बर्फ वितळत असून समुद्राच्या पाण्याची पातळी देखील वाढते आहे. हे जर  असेच राहिले तर सृष्टीचे पर्यावरण व पशुपक्ष्यांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवतीळ.


 प्रामुख्याने पडणारे प्रश्न :

अतिनील किरणे किती धोकादायक आहेत:


 सूर्यप्रकाशात सोबत येणारी ही किरणे मानव प्राणी व वृक्षांना देखील तेवढीच हानिकारक आहेत. मानवाच्या त्वचा, डोळ्यांना इजा पोहोचते, आपल्या आरोग्य आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो.

 

ओझोन परमाणूची  हानी कशी होते:

 

मानवी वापरातील वस्तुमुळे क्लोरोफ्लोरो कार्बन वायू वातावरणात उत्सर्जित होतो. त्यामुळे ओझोनच्या थरात घट होते. वातावरणातील हवेत इतर वायू बरोबर ओझोन परमाणु असतात पण ते खूप अल्प प्रमाणात असतात, म्हणजेच हवेच्या दहा लाख परमाणु मध्ये दहापेक्षा कमी परमाणु ओझोनचे आहेत.

 

ओझोन संरक्षणासाठी आपण काय करू शकतो:


 शक्य होईल तेव्हा ओझरला  हानिकारक उत्पादने न वापरणे किंवा त्यांचा वापर कमी करणे आपल्या हातात आहे. अशी उपकरणे (स्प्रे, अग्निप्रतिबंधक उपकरणे, शीतकपाट) खरेदी करताना यांच्यावरील लेबल तपासून ओझोन थराचे हित जपणारी उत्पादने खरेदी करावीत. ओझोन थराला उपउपद्रव पोचवणारी रसायने असणारी उत्पादने नष्ट करताना किंवा दुरुस्त करताना ओडीएस हाताळू शकणार्‍या प्रमाणपत्रधारित तंत्रज्ञाकडे जावे.

 उन्हात फिरताना योग्य ती दक्षता घ्यावी. शक्‍यतो उन्हात फिरणे टाळावे. यासोबत खारीचा वाटा म्हणून आपण पिंपळ, वड, कडुनिंब अशा दीर्घकाळ टिकणाऱ्या वृक्षांचे संवर्धन व रोपण करावे. याबरोबर घरोघरी प्राणवायू व ओझोन वायूवर्धक बहुगुणी तुळस लावण्याचा संकल्प आजच्या दिवशी नक्कीच करा. शेवटी एकच सांगू इच्छिते आज सबंध विश्व 'ओझोन संरक्षण दिन' साजरा करत आहे जणू निसर्गोत्सवच आहे .खरंचप्रेमाने मन भरून गेले. तुम्ही चुकलात पण कोमल मनांना वेळीच सावरा. मी सांगितलेला हा वसा टाकू नका.  हा वसा पुढे चालवा.परत एकदा हिरवी समृद्ध वसुंधरा बनवण्याचा इरादा करा. तुमच्या घामाच्या थेंबातून परत एकदा मला बहार आणा.

स्वर्गातील अप्सरांचे मनोराज्य रंगवत बसण्यापेक्षा माझे पूर्वीचे सौंदर्य मला परत करा. नव्याने सुरुवात करून स्वर्गाहुनी सुंदर मला बहाल कराल असा मला विश्वास आहे. आपल्या आईला दिलेले हिरव्या शालू चे वचन पूर्ण करा.

 

तुमची वात्सल्यसिंधू प्रेमस्वरूप माता 

 -पृथ्वी




Comments

Post a Comment

ह्या पोस्ट नक्की वाचा.

जैवविविधतेचे संवर्धन करण्याचे ६ फायदे, 6 benefits of Conserving Biodiversity

१० विज्ञानविषयक पुस्तके (मराठीतून) जी तुम्ही वाचायलाच हवीत!! 10 Science Books in Marathi you must read!!

सूर्य पृथ्वीभोवती फिरतो की पृथ्वी सूर्याभोवती फिरते ? Earth revolves around the Sun or Sun revolves around the Earth?

आयुका :IUCAA ,पुणे

संन्याशासारखा विचार करा या जय शेट्टी यांच्या पुस्तकची प्रस्तावना; Introduction : Think Like a Monk by Jay Shetty (Marathi)