संतुलित आहार म्हणजे काय ,तो का व कसा घ्यावा?


शरीरक्रियाशास्त्रामध्ये आहार हा महत्त्वपूर्ण विषय आहे. शालेय जीवनात विज्ञानाच्या  पेपर ला घोकंपट्टी करून उत्तरं लिहितो व आहाराशी असणारा संबंधास  आहुती देतो. पृथ्वी व मानवाचा जितका प्राचीन इतिहास आहे, तितकाच मानव व त्याचा आहार आणि त्याच्याशी संबंधित असणारे आजार यांचाही ऋणानुबंध पुरातन आहे. पाषाण युगात १० ते १२ हजार वर्षांपूर्वी झालेली क्रांती व मानवाने केलेली शेती यामुळे अन्न शोधाची समस्या कायमची  संपुष्ट झाली व मानवाच्या आयुष्यात स्थैर्य प्राप्त झालं. तुम्ही काय खाता,यावरून तुम्ही कसे आहात हे आहार तज्ज्ञ तुम्हाला सांगतात. कारण आपण जे खातो त्यातून आपल्या मन  व शरीरावर परिणाम होत असतो.

अहं वैश्वानरो भुत्वा प्राणिनां देहमाश्रित: ।
प्राण पान समा युक्त: पचाम्यन्न चतुविर्धम।। 

गीतेच्या पंधराव्या अध्यायातील १४ वा श्लोक थोडक्यात हेच सांगतो की अन्नातून विविध पोषक पदार्थ ऊर्जा मिळवण्यासाठी वापरले जातात यामध्ये पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्त्वे, तसेच सेंद्रिय पोषक पदार्थ इत्यादींचा समावेश होतो.अन्न  कशाचा बनतं?त्याचं शरीरात काय होतं व त्याचे व रोगाचे काही समीकरण असते का? यांसारखे प्रश्न बालके आपल्याला विचारत असतात परंतु आपणामध्ये जागृत शेफ एवढा छान पदार्थ केला त्याच कौतुक नाही म्हणून रागावतात न नसत्या चौकश्या म्हणून रागावतात परंतु मनात असलेला स्वयं कथित 'शेफ'आपल्यातील आहार तज्ज्ञाची वाढ होऊच देत नाही त्यामुळे ती व्यक्ती मुलांना योग्य प्रकारे मार्गदर्शनच करू इच्छित नाही. खरे तर हे प्रश्न बाळबोध  नसून या प्रश्नांचा उलगडा करणे तेवढच रंजक व उत्कंठावर्धक आहे. चार वेदांपैकी 'अथर्ववेद' यांच्या शेवटच्या भागात म्हणजे आयुर्वेदात आरोग्यविज्ञानाचा  समावेश केलेला आहे. चरकसंहितेत 'संतुलित आहार' ही संकल्पना आहे संतुलित आहार  मनाचं संतुलन राखतं आणि  यातून प्रकृतीची स्थापना होते म्हणून तर 'जैसे खाओ अन्न, वैसा होगा मन'असं म्हटलं आहे. तर अयोग(आहार न घेणे), अतियोग (खूप जास्त प्रमाणात अन्नग्रहण करणे) व मिथ्यायोग (चुकीचा आहार घेणे) यातून रोग उत्पत्ती होते. अन्नाचं पचन, शरीरात निर्माण होणारे रस, मांस, रक्त, मेद, अस्थी, मज्जा व शुक्र कसे तयार होतात यांचेही सखोल वर्णन चरक संहितेमध्ये केलेले आहे.
     वदनी कवळ घेता... म्हणण्यापूर्वी आपल्या ताटामध्ये  कोणत्या अन्नपदार्थांचा समावेश असावा याचे वर्णन  सुश्रुत करताना म्हणतात-
भक्ष्य भोज्य च पेयं च  लेह्य च चोष्य च पिच्छिलम ।
इति: भेदा: षडन्नस्य मधुराद्याश्र्च षड्रसा:।।
मधूरो लवणस्तिक्त:  कशायोस्ल: कटूस्रथा ।
संतीती रसनीयत्वादन्नआद्ये  षडमी रसा: ।।

अर्थात अन्न हे चावून खाता येईल, भातासारखे सहज खाता येईल, पीता येईल, चाटून खाता येईल, चोखून खाता येईल म्हणजेच चटणी कोशिंबीर असणारे पदार्थ अशा सहा प्रकारांनी बनलेले असते, तसेच मधुर, खारट, तिखट, तुरट, आंबट, कडू अशा सहा त्यांच्यात चवी समाविष्ट असततत् असं त्यांनी सांगितले आहे. अशा  अन्नपदार्थांचे सेवन  यानेच होईल आरोग्य संवर्धन असे म्हणणे अतिशयोक्ती पूर्ण नक्कीच ठरणार नाही.

ना आवडे पिझ्झा कावळ्यास
 न कोकिळेला बर्गर 
त्यांना हवय हळदी वाले 
दूध वाटीभर....
दोघे भेटले डायनिंग टेबलवर
 दर्शवली आपली आवड
 पिझ्झा बर्गर चाउमीन  नावानेच 
 मळमळून उलट्या होतात भडभड गरमागरम पोळी भाकरी 
खा सकाळी सकाळी 
भात वरण भाजी कोशिंबिरी बरोबर चटणी
खा दुपारच्या जेवणावेळी
 कोशिंबीर, सॅलड ,पालेभाज्या ताज्या खाल जरी
 तरच प्रसन्न होईल तुमच्यावर आरोग्य देवता धन्वंतरी 
आरोग्य मिळेल तेव्हाच मिळतील पोषकतत्वे शरीरासाठी पूर्ण
 दिवसभर कष्ट करूनही राहाल उत्साहपूर्ण
 विश्व प्रिय झाले आहे आपले जेवन भारतीय
 आपणच आपल्या जेवणास का करावे अप्रिय 
घेऊन आहार संतुलित म्हणे करू प्रफुल्लित उत्साहपूर्ण पण मनाने गाऊ आरोग्य पूर्ण जीवनाचे आनंद गीत

                    

Comments

ह्या पोस्ट नक्की वाचा.

जैवविविधतेचे संवर्धन करण्याचे ६ फायदे, 6 benefits of Conserving Biodiversity

१० विज्ञानविषयक पुस्तके (मराठीतून) जी तुम्ही वाचायलाच हवीत!! 10 Science Books in Marathi you must read!!

सूर्य पृथ्वीभोवती फिरतो की पृथ्वी सूर्याभोवती फिरते ? Earth revolves around the Sun or Sun revolves around the Earth?

आयुका :IUCAA ,पुणे

संन्याशासारखा विचार करा या जय शेट्टी यांच्या पुस्तकची प्रस्तावना; Introduction : Think Like a Monk by Jay Shetty (Marathi)