विज्ञानवाटा




आईन्स्टाईन कुशाग्र बुद्धिमत्तेच्या होता हा आदर भाव ठेवणे अतिउत्तम आहे पण आपण सर्वसामान्य आहोत, विज्ञान समजण्याची कुवत असतानाही या बाबतीत मनात विचार आणणे ही महापाप आहे. काय झाले आपण न्यूटन आइन्स्टाईन नसलो तर मनातील उत्कंठा शमवण्यासाठी अशा ज्ञानपिपासू नी आपलं लॉजिक विकसित करणे व प्रयोगाची तयारी ठेवली तरी विज्ञानवाटांवर हे ज्ञान पिपासू आनंदाने चालू शकतात. आता म्हणजे नक्की काय करायचं, हे सुचवणारा हा 'विज्ञानवाटा' नावाचा लेख...
   विज्ञान, विज्ञान म्हणजे खुप गंभीरतेने वाचण्यासारखा किंवा आंबट तोंड लांब चेहरे करून ऐकण्यासारखा विषयच नाही. फक्त सैद्धांतिक माहिती वाचून किंवा सांगून माहितीचा भरमसाठ साठा करणाऱ्या प्रियजनांना सांगावेसे वाटते, आपल्या आयुष्यात विज्ञान अनुभवता आले पाहिजे, आपण त्यामध्ये जगलो पाहिजे, दैनंदिन जीवन जगताना येणाऱ्या समस्या व त्यांचे समस्या निराकरण होताना असणारी विज्ञानाची भूमिका म्हणजे खरे विज्ञान प्रेमी आयुष्य.एकंदरीत म्हणायचे झाल्यास, ज्ञानाचे उपयोजन करणे म्हणजेच प्रयोग करणे व आपल्याला काय करता येईल हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा. जेवढ्या नेमकेपणाने, टोकदारपणे विचारू तितकीच आपली वैज्ञानिकता वाढेल. त्यापुढची पायरी म्हणजे 'समस्या -निराकरण' तेही क्रमबद्ध पद्धतीने . ही पायरी यशस्वी करण्यासाठी पर्याय  स्वतः निवडावा. व्यक्तिगत  कि सामूहिक...यामध्ये साधनांची जुळवणी,निष्कर्ष पद्धती,निरीक्षणे अशा गोष्टी येतात.
 सुरुवात आपण कशा प्रश्नापासून करूया 

तुम्ही ज्यावर हा लेख वाचत आहात या तंत्रज्ञानाचा आपल्याला आपली कार्यक्षमता वाढवणे व वेळ व्यवस्थापनात खरोखर किती उपयुक्त ठरतो?

 अलीकडे डिजिटल तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे आपल्या आरोग्याच्या समस्या डोके वर काढत आहेत, यातून शारीरिक व्याधी बरोबर मानसिक व्याधी ही आपल्याला त्रस्त करतात हे आपण अनुभवतो. तसेच 

आपल्या होणाऱ्या वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी आपण काय करू शकतो?

 हाच आपला प्रथम वैज्ञानिक प्रयोग असेल. आत्ममग्नतेच्या  विळख्यातुन  एकदा बाहेर पडून पाहूया. आपसूकच अनेक प्रश्न मनात पिंगा घालतील. याव्यतिरिक्त आपल्या प्रयोगांबद्दल आपल्या आप्तस्वकीयांशी भरभरून बोलल्यास ज्ञानाची नवनवीन कवाडे खुली होतील. उदाहरणार्थ फेसबुक मित्र, आभासी मित्रांची यादी न लांबवता प्रत्यक्षात भेटून किंवा फोनवरून संपर्क करुन चार मित्र जोडणे, क्रिकेट सामने/वेबसिरीज  पाहत दिवस घालवण्यापेक्षा  सकाळ-सायंकाळचा खुल्या मैदानावरील फेरफटका ,व्यायाम,प्राणायाम करणे,मोबाईल मध्ये गेम खेळून त्याचे चार्जिंग सम्पवण्यापेक्षा  घरात कुटुंबियांसोबत बैठे खेळ खेळून स्वतःला रिचार्ज करणे.


काही गमतीदार प्रयोग:
एकट्याने-समूहाने,लहान-थोराने,स्त्री-पुरुषाने करून आपल्या रिकाम्या वेळेस क्वालिटी टाइम बनवण्यासारखे होईल.

 कृती:
 कुंडी, परिसरात, मोकळ्या जागेत घरातील सदस्यसंख्या एवढी झाडे लावणे. (अगदी कोणत्याही प्रकारची)
 त्यांची देखभाल करणे.
निरीक्षणे:
 त्यांची होणारी वाढ, लागलेला वेळ, त्यावर होणारे चांगले वाईट परिणाम यांची निरीक्षणे काळजीपूर्वक करणे.
 नोंदी:
 या निरीक्षणाच्या नोंदी ठेवणे. याच बरोबर यामधून मिळणारे उत्पन्न, तोटा -फायदा यांचे हिशोब ठेवणे.
 महत्त्वाच्या नोंदी:
 केलेल्या प्रयोगातून झालेले फायदे, त्यासाठी घेतलेली विशेष मेहनत, घेतलेल्या तोटे, त्यामागे झालेल्या चुका त्यांची कारणे व त्यावर करता येण्यासारखे उपाय यांची टिपणे ठेवणे.
 अशाप्रकारे काही प्रयोगांचे विषय पुढीलप्रमाणे:
 घरातील 'रिटायर्ड बट नॉट टायर्ड' लोकांना करता येण्यासारखे प्रयोग:

१ घरातील बालवीरांना अंधश्रद्धाळू न बनवतात प्रत्येक गोष्टीला चमत्काराचे मुखवटे न घालता त्यामागचे वैज्ञानिक सत्य सांगणे. जादू, राजाराणी यांपेक्षा विज्ञान कथा सांगण्यावर भर द्यावा, विविध विज्ञान संकल्पना सांगताना बालकांना रुजेल आवडेल अशा गाण्यांमध्ये त्याचे रूपांतरण करावे. त्यांच्याबरोबर विविध शारीरिक, वैज्ञानिक,बौद्धिक खेळ खेळावेत.

२. समाज माध्यमांवर येणाऱ्या माहितीची खातरजमा करूनच इतरत्र प्रसार करण्याचं धैर्य करावे. कारण त्यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन ओळखणे अगोदर महत्त्वाचे असते.
नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या वर्गाने
 १. आपल्या आईवडिलांकडून मिळणारे अमूल्य ज्ञानभंडार स्मार्टफोनमध्ये लेखांकित करून ठेवावे (यामध्ये औषधी उपाय, दिनचर्या, आहारशास्त्र, शेतीविषयक ज्ञान,)

 २.त्यांनी आजूबाजूच्या प्राणी-पक्षांचे निरीक्षण, अवकाश निरीक्षण, वनस्पतींचे शुष्क वानसालय,विविध  उत्तम पुस्तकांचे सारांशीकरण करणे.या उपक्रमातून तुमच्या ज्ञानेंद्रियांची वृद्धी होईल हे निश्चित.
 ३. आपल्याभोवती जळी स्थळी काष्टी पाषाणी अनेक गोष्टी आहेत आपल्या सोडवण्यासाठी त्यांचा पाठपुरावा करावा.
 
  घरातील मध्यमवयीन वर्गासाठी काही प्रयोग:

१. कचरा वर्गीकरण केल्यानंतर हिरव्या कचऱ्याचे कंपोस्ट खत करण्याकरिता टाळेबंदी कालावधी सारखा उत्तम मुहूर्त नाही.
 २. कोणतीही एक कृती ज्याने  विज्ञानातील नव्या संकल्पनेचा उगम होईल.

 ३. पर्यावरणातील नैसर्गिक स्रोतांची शक्य तेवढी  बचत व त्यांचे पुनर्चक्रीकरण.
 
४. रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या अनेकाविध घटना व त्यामागचे वैज्ञानिक कारण त्यांची नियमित टिपणे ठेवणे.
 ५. घरातील थोरामोठ्यांना विज्ञानातील अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती व हाताळणी करण्यास शिकवणे, ही विज्ञानसेवा नक्कीच ठरू शकते भलेही अनेक गोष्टी गुढ राहतील, परंतु अशा प्रश्नांच्या निर्मिती मागचा मिश्किल आनंद तर आपल्याला नक्कीच प्राप्त होईल. चला तर मग विज्ञान सेवेचे व्रत घेऊन तुम्ही कोणता प्रयोग केला यावर सविस्तर आम्हाला नक्की कळवा व विज्ञानप्रेमी बनून विज्ञानवाटा आपल्याशा करूया.
        

Comments

ह्या पोस्ट नक्की वाचा.

जैवविविधतेचे संवर्धन करण्याचे ६ फायदे, 6 benefits of Conserving Biodiversity

१० विज्ञानविषयक पुस्तके (मराठीतून) जी तुम्ही वाचायलाच हवीत!! 10 Science Books in Marathi you must read!!

सूर्य पृथ्वीभोवती फिरतो की पृथ्वी सूर्याभोवती फिरते ? Earth revolves around the Sun or Sun revolves around the Earth?

आयुका :IUCAA ,पुणे

संन्याशासारखा विचार करा या जय शेट्टी यांच्या पुस्तकची प्रस्तावना; Introduction : Think Like a Monk by Jay Shetty (Marathi)