रामानुजन

श्रीनिवास रामानुजन (जन्म : तिरोड-तंजावर, २२ डिसेंबर १८८७; मृत्यू : कुंभकोणम, २६ एप्रिल १९२०) भारतीय गणितज्ञ होते. रामानुजन हे अलौकिक गणिती होते. रामानुजन हे गणिताचा विचार करीत असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे म्हणूनच ते झोपेतून जागे होताच अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत.
या महान गणित्तज्ञा वर बोलू काही...
              रामानुजन
गणितज्ञ रामानुजन होते महान
संपूर्ण जगात आजही त्यांना मानाचे स्थान

प्रतिभावंत बुद्धीला   जग आजही करते सलाम
कायच अलौकिक आहे दुनियेचा त्यास सलाम

अंकांची त्यांची दुनिया अंकांमध्ये व्यस्त असत
अंक हा त्यांचा ईश्वर, अंकांची पूजा करत

२२ डिसेंबर १८८७  या दिनी
चिरस्मरणीय मंगलमय घटना घडली या क्षणी

या मंगल दिनी रामानुजन यांचा जन्म गणिताच्या इतिहासात नवव्या प्रतिमेस मिळाला पुनर्जन्म

पाचव्या वर्षी सुरू केला विद्याभ्यास आपल्या कुशाग्र बुद्धीने शिक्षकांचे बनले ते खास

गणितामध्ये प्रथम येणे होते त्यांचे स्वप्न त्यासाठीच अप्पर प्रायमरी परीक्षा तयारी असायचे ते मग्न

४२/४५  गुण मिळवले अंकगणितात
पैकीच्या पैकी गुण नसल्याने बुडाले दुःखात

पहिला शोधप्रबंध होता कठीण व क्लिष्ट
सर्व सामान्यांना वाचताना येऊ लागले अनिष्ट

जगात त्यांची प्रतिभेची आता  जाणीव झाली
विविध तज्ज्ञांनी  शुभेच्छा पत्रांची बरसात केली

१६ जानेवारी १९१३  प्रा. हार्डी ना प्रथम पत्र लिहिले
प्रमेयानी वर्णित पत्र इतिहासात प्रसिद्ध झाले

हार्डी यांनी लक्षपूर्वक पत्र वाचले
अलौकिक प्रतिभा पाहून तेही अचंबित झाले

१८ फेब्रुवारी १९१८ ला त्यांचा गौरव झाला 'रॉयल सोसायटी लंडन' ने फेलोशिप  देऊन सत्कार केला

'मद्रास' विश्वविद्यालयात ही मिळाले सत्कार व सन्मान
गणिताचे प्राध्यापक म्हणून रुजू होण्याचा दिला त्यांना मान

भारताची प्रतिभा.. भारतीय शरीरास इंग्लंड प्रतिकूल होते
थंड हवा.. बिघडणारी तब्येत.. त्यांना हे त्रासदायक होते

या शोधातच इंग्लंड सोडले थेट भारत गाठले
संशोधनाच्या विविध सुविधांच्या अभावाने मन दुःखी झाले

कसे होणार बरे? देवालाच नव्हते मंजूर गणिताला विराम देणे रामानुजननी केले नामंजूर

अंतसमयीदेखील  देखील मॉक,थिटा फंक्शन वर  काम केले
घनिष्ठ मित्र हार्डी ना कार्याचे पत्र तात्काळ पाठवले

बिकट संकटात न झुकणारे,काळापुढे हरले त्यांच्या जाण्याने सर्व विश्व शोकाकुल झाले

२६ एप्रिल १९२० ला  झाले विलीन अनंतात
कार्य त्यांचे अजूनही अजरामर आहे जनमाणसांत

Comments

ह्या पोस्ट नक्की वाचा.

जैवविविधतेचे संवर्धन करण्याचे ६ फायदे, 6 benefits of Conserving Biodiversity

१० विज्ञानविषयक पुस्तके (मराठीतून) जी तुम्ही वाचायलाच हवीत!! 10 Science Books in Marathi you must read!!

सूर्य पृथ्वीभोवती फिरतो की पृथ्वी सूर्याभोवती फिरते ? Earth revolves around the Sun or Sun revolves around the Earth?

आयुका :IUCAA ,पुणे

रात्रीच्या आकाशात एवढ्या साऱ्या ताऱ्यांमध्ये आपल्या सूर्यमालेतील आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसणारे ५ ग्रह कसे ओळखायचे?(How to Identify Planets of our Solar System in Night sky?)