ताण-तणावाचा सामना करण्यासाठीचे ७ परिणामकारक उपाय / 7 Effective Ways to Face the Stress

ताण-तणावापासून मुक्तता Relief from stress being happy आनंदी रहा
ताण-तणावापासून मुक्तता Relief from stress

धकाधकीच्या जीवनात आपण विविध समस्यांना सामोरे जात असतो, तेव्हा मनामध्ये बैचेनी निर्माण होते, यामुळे अर्थातच मानसिक आरोग्य खालावते. सध्या नैराश्य व ताणतणाव हेच सर्वाधिक आरोग्याला घातक आहेत. ताण मेंदूवर वाईट परिणाम करतो, त्यामुळे आपण मानसिकरित्या आजारी पडतो, त्यामुळे आपल्या जैविक संतुलनावर परिणाम होतो. इतर व्यक्तीमुळे ताण निर्माण होतो,अशी  ताणाविषयी सर्व सामान्य व्यक्तींची पूर्व मते आहेत, परंतु बऱ्याच मानसशास्त्रज्ञांनी मांडलेल्या विचारा नंतर ताण हा प्रत्येक वेळी हानिकारकच असतो असे नाही किंबहुना, *कोणत्याही बदलाला दिली जाणारी प्रतिक्रिया म्हणजे  ताण होय.*  'ताणा'शिवाय जीवन शक्यच नाही, परंतु अति-ताण किंवा दीर्घकालीन ताण अपायकारकच असतो असे संशोधनाचे जनक 'हान्स सॅली' यांनी सांगितले. १९३५ मध्ये  सॅली यांनी सिद्धांत मांडला, यानुसार ताण हा कोणत्याही आजाराचे प्रमुख कारण असून दीर्घकालीन ताणामुळे दूरगामी रासायनिक बदल घडून येतात.याच्या पुढील अवस्था आहेत.


तणावस सामोरे जातानाच्या तीन अवस्थाहान्स सॅलीचा सिद्धांत  theory of Hans Salley : हान्स सॅलीचा सिद्धांत  theory of Hans Salley
तणावस सामोरे जातानाच्या तीन अवस्था : हान्स सॅलीचा सिद्धांत  theory of Hans Salley : हान्स सॅलीचा सिद्धांत  theory of Hans Salley

१. सावधान अवस्था : (Alarm Stage):
येथे व्यक्ती ती एखाद्या धोक्याचा सामना करण्यासाठी तयार होत असते.

 २. प्रतिरोध अवस्था (Resistance Stage)
 या अवस्थेमध्ये ताणाचे स्तर सर्वात जास्त असतो. प्रयत्नाने शरीर ताणाचे समायोजन करते.

३. क्लांती व्यवस्था (Tired Stage):
या अवस्थेत थकाव्यामुळे ताणाचे प्रमाण कमी होऊ लागते असते.
 ताणाचा सामना करण्यापूर्वी त्यांचे स्रोत कोणते ते पाहूया. आता ताणाची तीव्रता ठरवण्यासाठी त्यांचे प्रकार पाहणे आवश्यक ठरते -

१. शारीरिक ताण :
अतिश्रम, शरीराची  दगदग यामुळे शारीरिक ताण जाणवतो.
 २. मानसिक ताण
आपल्या विशिष्ट मनस्थितीतून मानसिक ताण निर्माण होतो.
 ३. सामाजिक ताण : 
इतर व्यक्तींबरोबर आपली होणारी आंतरक्रिया व त्यातून होणारा ताण यामुळे सामाजिक ताण निर्माण होतो.
 ४. परवेशीय ताण : 
परिसर , वायू प्रदूषण, गर्दी,  गोंगाट म्हणजेच सभोवतालच्या परिस्थितीतुन परवेशीय ताण निर्माण होतो.
    आता आपण ताणाशी सामना कसा करावा हे समजावून घेऊया.

१. बेन्सन शिथिलीकरण प्रक्रिया :
 हर्बर्ट बेन्सन यांनी सुचवलेल्या शिथिलीकरण प्रक्रियेत खालील घटक महत्त्वाचे आहेत.यामध्ये-
 १. स्वस्थ अवस्थेत शांत बसणे.
 २. डोळे बंद करणे.
 ३. स्नायू शिथिल करणे, यात पायापासून सुरुवात करून हळूहळू चेहऱ्यावरचे स्नायू शिथिल करणे.
 २. सहज श्वासोच्छवासाची क्रिया :
प्राणायाम Pranayam
प्राणायाम Pranayam

दहा मिनिटे सहज श्वासोच्छवासाची क्रिया करणे दररोज एक-दोनदा तरी  ही क्रिया करावी, ही क्रिया जेवण करण्यापूर्वीच करावी. जेवण झाल्यानंतर दोन तासांच्या आत मध्ये हिचा सराव करण्याचे टाळावे, कारण चयापचय क्रियेवर त्याचे विपरीत परिणाम होतात.
 ३. ध्यानधारणा :  

ध्यान याचा अर्थ एकरूप होणे होय.त्यासाठी आपण श्वासापासून सुरुवात करतो.
 ध्यान करणे म्हणजे काय? 
डोळे बंद करून आपल्या नैसर्गिक श्वासाबाहेर राहा.असे कमीत कमी २०तरी श्वास करा...
 यात मन स्थिर ठेवण्यास मदत होते. दहा पंधरा मिनिटांचे ध्यान आपली सर्व दबाव,ताण तणावापासून सुटका करते.

 ४. जैवप्रतिभरण :
जैवप्रतिभरण Bio-remediation
जैवप्रतिभरण Bio-remediation

 यामध्ये तीन अवस्था असतात.
 i) विशिष्ट शारीरिक प्रतिक्रियांबद्दल अशी जाणीव निर्माण करणे.
 ii) त्यांच्यावर ताबा मिळवणाऱ्या पद्धतीचे अध्ययन करणे.
iii) ते उपयोगात आणण्याचे प्रशिक्षण देणे.

५. ताण संरोपण प्रशिक्षण :

 डोनाल्ड मायकेनबाज म्हणतात,  या प्रशिक्षणात व्यक्तीस स्वतःच्या नकारात्मक विचारांची ओळख पटवून देऊन त्यांची जागा सकारात्मक विचाराने भरून टाकण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

 ६. व्यायाम :

दिवसाची सुरुवात भरपूर घाम येईल अशा शारीरिक व्यायामाने करणे अत्यावश्यक आहे. यामध्ये धावणे, दोर-उड्या, गतीत चालणे ई. प्रकार करता येतील. व्यायामामुळे शरीरातील डोपामाईनची पातळी वाढल्यामुळे उत्साह व सकारात्मक वृत्तीमध्ये  कमालीची वृद्धी होते. तसेच हृदयाचे अभिसरण चांगले होते व शरीराच्या प्रतिकार क्षमतेमध्ये वाढ होते. 
 ७. जीवन कौशल्यांचा विकास :
 अभिव्यक्ती,  वेळेचे व्यवस्थापन,  तार्किक विचार, नातेसंबंधातील सुस्थिती, स्व काळजी, सकस आहार, सकारात्मकता, सामाजिक आधार, छंद जोपासणे यांसारख्या  गोष्टी अंमलात आणून आपल्या आयुष्यातील  तणाव दूर होऊन आरोग्य व स्वास्थ्य भर टाकली जाते.

ताणतणावाचे समायोजनाविषयीची माहिती कशी वाटली ती कमेंट्स करून सांगा. तुम्हाला या संकल्पनेबद्दल अधिक माहिती असेल किंवा दिलेल्या माहितीत सुधारणा सुचवायची असेल, तसेच कोणते प्रश्न असतील तर कमेंट्स करा. चर्चेतून अनेक संकल्पना स्पष्ट होतात व समस्येचे निराकरण करण्यास मदत होते. 

फेसबुक पेज लाईक करा: विज्ञानवाटा
www.facebook.com/vidnyanwata

#विज्ञानवाटा #vidnyanwata
#मानसशास्त्र #psychology

संदर्भ :
१. इयत्ता १२ वी मानसशास्त्र 
http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx

Comments

ह्या पोस्ट नक्की वाचा.

जैवविविधतेचे संवर्धन करण्याचे ६ फायदे, 6 benefits of Conserving Biodiversity

१० विज्ञानविषयक पुस्तके (मराठीतून) जी तुम्ही वाचायलाच हवीत!! 10 Science Books in Marathi you must read!!

सूर्य पृथ्वीभोवती फिरतो की पृथ्वी सूर्याभोवती फिरते ? Earth revolves around the Sun or Sun revolves around the Earth?

आयुका :IUCAA ,पुणे

संन्याशासारखा विचार करा या जय शेट्टी यांच्या पुस्तकची प्रस्तावना; Introduction : Think Like a Monk by Jay Shetty (Marathi)