संन्याशासारखा विचार करा या जय शेट्टी यांच्या पुस्तकची प्रस्तावना; Introduction : Think Like a Monk by Jay Shetty (Marathi)

'संन्याश्यासारखा विचार करा' या पुस्तकाची प्रस्तावना तुम्हाला नवीन कल्पना हवी असेल, तर जुने पुस्तक वाचा. (इव्हान पावलॉव) मी अठरा वर्षांचा होतो आणि लंडनमधील कास बिझनेस स्कूल या महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिकत होतो, त्या वेळी माझ्या एका मित्राने मला त्याच्याबरोबर एका संन्याशाचं व्याख्यान ऐकायला येण्यास सांगितलं. मी विरोध केला. ‘एखाद्या संन्याशाचं व्याख्यान ऐकायला मी का जावं?’ महाविद्यालयाच्या परिसरात मी नेहमीच सीईओंना, प्रसिद्ध व्यक्तींना आणि इतर यशस्वी लोकांना व्याख्याने देताना पाहत होतो; पण मला एखाद्या संन्याशामध्ये बिलकूल स्वारस्य नव्हतं. ज्या लोकांनी प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात काही गोष्टी मिळवलेल्या आहेत, अशा वक्त्यांचं व्याख्यान ऐकण्यास मी प्राधान्य देत होतो. माझ्या मित्राने आग्रहच धरला आणि अखेरीस मी म्हणालो, ‘जर त्यानंतर आपण बारमध्ये जाणार असलो तरच मी येईन.’ ‘प्रेमात पडणं’ हा वाक्प्रचार जवळजवळ नेहमीच अगदी निर्णायकपणे शृंगारिक नातेसंबंधांचं वर्णन करण्यासाठी वापरला जातो; पण त्या रात्री मी त्या संन्याशाला त्याचे अनुभव सांगताना ऐकलं आणि मी त्याच्या प्रेमातच पडलो. व्य...