ताण-तणावाचा सामना करण्यासाठीचे ७ परिणामकारक उपाय / 7 Effective Ways to Face the Stress

ताण-तणावापासून मुक्तता Relief from stress धकाधकीच्या जीवनात आपण विविध समस्यांना सामोरे जात असतो, तेव्हा मनामध्ये बैचेनी निर्माण होते, यामुळे अर्थातच मानसिक आरोग्य खालावते. सध्या नैराश्य व ताणतणाव हेच सर्वाधिक आरोग्याला घातक आहेत. ताण मेंदूवर वाईट परिणाम करतो, त्यामुळे आपण मानसिकरित्या आजारी पडतो, त्यामुळे आपल्या जैविक संतुलनावर परिणाम होतो. इतर व्यक्तीमुळे ताण निर्माण होतो,अशी ताणाविषयी सर्व सामान्य व्यक्तींची पूर्व मते आहेत, परंतु बऱ्याच मानसशास्त्रज्ञांनी मांडलेल्या विचारा नंतर ताण हा प्रत्येक वेळी हानिकारकच असतो असे नाही किंबहुना, * कोणत्याही बदलाला दिली जाणारी प्रतिक्रिया म्हणजे ताण होय. * 'ताणा'शिवाय जीवन शक्यच नाही, परंतु अति-ताण किंवा दीर्घकालीन ताण अपायकारकच असतो असे संशोधनाचे जनक 'हान्स सॅली' यांनी सांगितले. १९३५ मध्ये सॅली यांनी सिद्धांत मांडला, यानुसार ताण हा कोणत्याही आजाराचे प्रमुख कारण असून दीर्घकालीन ताणामुळे दूरगामी रासायनिक बदल घडून येतात.याच्या पुढील अवस्था आहेत. तणावस सामोरे जातानाच्या तीन अवस्था : हान्स सॅलीचा ...