Posts

संन्याशासारखा विचार करा या जय शेट्टी यांच्या पुस्तकची प्रस्तावना; Introduction : Think Like a Monk by Jay Shetty (Marathi)

Image
 'संन्याश्यासारखा विचार करा' या पुस्तकाची प्रस्तावना  तुम्हाला नवीन कल्पना हवी असेल, तर जुने पुस्तक वाचा. (इव्हान पावलॉव) मी अठरा वर्षांचा होतो आणि लंडनमधील कास बिझनेस स्कूल या महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिकत होतो, त्या वेळी माझ्या एका मित्राने मला त्याच्याबरोबर एका संन्याशाचं व्याख्यान ऐकायला येण्यास सांगितलं. मी विरोध केला. ‘एखाद्या संन्याशाचं व्याख्यान ऐकायला मी का जावं?’ महाविद्यालयाच्या परिसरात मी नेहमीच सीईओंना, प्रसिद्ध व्यक्तींना आणि इतर यशस्वी लोकांना व्याख्याने देताना पाहत होतो; पण मला एखाद्या संन्याशामध्ये बिलकूल स्वारस्य नव्हतं. ज्या लोकांनी प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात काही गोष्टी मिळवलेल्या आहेत, अशा वक्त्यांचं व्याख्यान ऐकण्यास मी प्राधान्य देत होतो.  माझ्या मित्राने आग्रहच धरला आणि अखेरीस मी म्हणालो, ‘जर त्यानंतर आपण बारमध्ये जाणार असलो तरच मी येईन.’ ‘प्रेमात पडणं’ हा वाक्प्रचार जवळजवळ नेहमीच अगदी निर्णायकपणे शृंगारिक नातेसंबंधांचं वर्णन करण्यासाठी वापरला जातो; पण त्या रात्री मी त्या संन्याशाला त्याचे अनुभव सांगताना ऐकलं आणि मी त्याच्या प्रेमातच पडलो. व्य...

जेव्हा जगण्याची दिशा हरवली आहे असं वाटू लागतं, तेव्हा खंबीर मार्गदर्शक बनणाऱ्या 'संन्याशासारखा विचार करा' पुस्तकाविषयी काही... Think Like a Monk - Jay Shetty (Marathi)

Image
(अमेझॉनवर पुस्तक खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.) 'संन्याशासारखा विचार करा' पुस्तकाविषयी काही... जय शेट्टी यांच्या पुस्तकामध्ये संन्याशाची मनोरचना स्वीकारण्याचे तीन टप्पे सांगितले आहेत. पहिला टप्पा हा आपल्याला मागे खेचणाऱ्या बाह्य प्रभावांपासून, अंतर्गत अडथळ्यांपासून आणि भीतींपासून आपली सुटका करून घेणं म्हणजेच त्या गोष्टी सोडून देणं हा असतो. याला आपण ‘सोडून द्या’. किंवा ‘जाऊ द्या’ असं म्हणतो. वाढीसाठी जागा मिळवण्याकरिता करावयाची साफसफाई म्हणून आपण याचा विचार करू शकतो. ‘आपली वाढ कशी होत राहील', हा दुसरा टप्पा असतो. तुम्हाला हेतू, उद्दिष्ट आणि आत्मविश्वास यांच्यासह निर्णय घेणं शक्य व्हावं, यासाठी तुमच्या आयुष्याची पुन्हा नव्याने जडणघडण करण्यास या टप्प्याची तुम्हाला मदत होईल. आपल्या पलीकडचं जग पाहून, आपल्या मनातील कृतज्ञतेची भावना व्यापक बनवून आणि ती इतरांशी वाटून घेऊन, तसंच आपले नातेसंबंध अधिक सखोल, दृढ बनवून ‘आपण मुक्तहस्ते देऊया’ हा टप्पा येतो. आपल्याला लाभलेल्या देणग्या आणि प्रेम आपण इतरांशी वाटून घेतो आणि आपल्याला खऱ्या आनंदाचा...

पृथ्वीचे मानवाला पत्र (जागतिक ओझोन संरक्षण दिन)

Image
 प्रिय मानवास,  अनेक प्रेमपूर्ण आशीर्वाद ...        मी सुरुवातीपासून स्वतःला खूप भाग्यवान समजते कारण,' जननी जन्मभूमिश्च स्वर्गदपी गरीयसी'   अशा अनमोल शब्दांमध्ये माझा गौरव केला गेला. माझ्या कुशीत जगणाऱ्या जीवसृष्टीच्या उभारणीमध्ये ऋषी, महर्षी, अध्यात्म शक्ती, व निसर्ग देवतेचा मोठा वाटा आहे. मी आदी-अनादी काळापासून लता,वेली यांनी बहरून गेले होते. तुझ्या सारख्या अनंत लेकरां बरोबर मी सुखासमाधानाने आयुष्याचा परमानंद घेत होते... पण, एक दिवस मला प्राण्या पक्षांच्या मधुर स्वरां ऐवजी जीवाचा आकांत ऐकु आला. यात वेदना व विरहाच्या संमिश्र भावना होत्या. दुःख दृश्य म्हणजे तुमचा एक बंधू धारदार  कुऱ्हाडीने माझ्या डेरेदार हिरव्या लेकरावर घाव घालून मातेपासून अलग करू पाहत होता. तेव्हाच ठरवलं, तुम्हाला योग्य तो धडा शिकवायचा.आई निष्ठूर होत नाही, ती मारते ते खून करण्यासाठी नसून आपल्या मुलांना योग्य संस्कार करणे हा त्यामागचा तिचा शुद्ध मानस असतो. आता सांगितलेला प्रसंग लहानपणापासून आपण ऐकला असेल. नंतर काय होते तर वृक्षतोड तुम्ही करत होता तेव्हा कुऱ्हाड तुमच्याच कोणाच...

आकाश कवेत घेताना... (अवकाश निरीक्षणाच्या इतिहासावर ओझरती नजर)

Image
सहज काल रात्री आकाशाकडे  लक्ष गेले असता  मनात विचार आला... २००९ साली ' आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र वर्ष ' साजरे केले परंतु अजूनही आपणास या या कधी निळेभोर तर कधी काळ्याकुट्ट कधी लालसर छटा पसरलेल्या तर कधी चमचम करणाऱ्या चांदण्यांनी सुशोभित होणाऱ्या अश्या अवकाशाची नेमकी व अद्ययावत स्वरूपाची  माहिती नाही ही खंत मनात वाटली. जॅने टेलर यांनी लिहिलेली, "Twinkle twinkle little star, How I wonder what you are, up above the world so high, like a diamond in the sky" या कवितेच्या ओळी सहज ओठांवर आल्या. खरंच आकाशातील चंद्र चंद्र सूर्य आणि चांदण्यांची विलोभनीय मांडणी  आदिम काळापासून मानवाला भूल पाडत आली आहे, असा विचारही मनात आला.  मानवाला प्राचीन काळापासून खुणावणाऱ्या आकाशाचे, आकाशातील घटनांची शास्त्रीय दृष्टिकोनातून निरीक्षणे करणे कधी सुरू झाले हा प्रश्न मनात आला आणि या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले खरेतर ही निरीक्षणे केव्हा सुरू झाली हे निश्चितपणे सांगता येणे शक्य नाही, पण सर्वात प्राचीन वेधशाळा म्हणावी अशी जागा इंग्लंडमध्ये 'सॅलिसबरी' च्या टेकडीवर आहे असे...

वैज्ञानिक पद्धतीने संशोधन करणे म्हणजे नक्की काय?

Image
वैज्ञानिक पद्धती : निरीक्षण, प्रयोग, परीक्षण व सामान्यीकरण याद्वारे ज्ञानाची बांधणी म्हणजे वैज्ञानिक पद्धती होय. अल्हाझेन या वैज्ञानिकाने ११ व्या शतकात  भौतिक प्रयोगाद्वारे सिद्ध केले की, "जी वस्तू आपल्या डोळ्यांना दिसते, तेथून प्रकाश सरळ रेषेत आपल्या डोळ्यात प्रवास करतो." हा वैज्ञानिक पद्धतीने प्रथम काढलेला निष्कर्ष आहे. या कल्पनेच्या आधारावर फ्रँकिस बेकन यांनी इ.स. १६२० मध्ये वैज्ञानिक पद्धतीचा पाया घातला. संशोधन : नैसर्गिक शास्त्रात किंवा सामाजिक शास्त्रात घडणाऱ्या घटनांचे स्पष्टीकरण व त्या घटनांना नियमन करणारी तथ्य यांच्याविषयी सामान्य नियम शोधण्यासाठी केलेला पद्धतशीर प्रायोगिक प्रयत्न म्हणजे संशोधन होय. ज्ञान म्हणजे उत्तर जाणून घेणे किंवा समस्येवर उपाय सुचवणे. उपयोजन म्हणजे ज्ञानाद्वारे जाणून घेतलेल्या उपायांची अंमलबजावणी करणे वैज्ञानिक पद्धतीचे सामान्यतः सहा ते सात टप्पे असतात. १. समस्या सूत्रन : 'असे का' याचे उत्तर माहीत नसेल तर त्या गोष्टीला समस्या म्हणतात. उदा. शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी आहे, ही विशिष्ट समस्या निश्चित केली. २. माहिती (तथ्य) संकलन ...

चला, बीजगोळ्यांच्या साहाय्याने झाडे लावूया... Let's plant trees with the help of seedballs...

Image
चला, बीजगोळ्यांच्या साहाय्याने झाडे लावूया ... बीजगोळे seedballs स्वीडनमधील अवघ्या १७ वर्षांची 'ग्रेटा थर्नबर्ग' हिने ढासळणाऱ्या पर्यावरणाचा जाब जगाला विचारला. बीजमाता पद्मश्री पुरस्कार प्राप्त 'राहीबाई पोपरे' यांनी विविध प्रकारच्या बीजांचे संवर्धन केले. तर आपण निसर्ग संवर्धनासाठी आपला खारीचा वाटा नक्कीच देऊ शकतो नाही का? पावसाळ्यात पावसाचे शुभ संदेश बरोबर पर्यावरण उपयुक्त एक सुंदर उपक्रम आपणासमोर सादर करताना अत्यानंद होतो आहे. आज तो मौका भी है और दस्तूर भी... मान्सूनपूर्वी या उपक्रमाबद्दल जाणून घेऊया, जेणेकरून हा उपक्रम अंमलात आणण्यास सुलभता येईल. १. बीजगोळे पद्धती म्हणजे काय?   बीज गोळे म्हणजे विविध बिया चिखला मध्ये टाकून त्यांचे चेंडूच्या आकाराचे बनवलेले गोळे होत. २. बीजगोळे विखरण पद्धती : जंगल हटवून अधिवास नष्ट करणं व विषाणूला आपल्याजवळ करणं. हे  टाळण्याचा महामंत्र म्हणजे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन... वृक्षरोपणासाठी हवी  ती रोपटी त्यावेळेस मुबलक प्रमाणात मिळत नाही. यावर जालीम उपाय  बीजगोळे बनवणे होय. ३. बीजगोळे कसे बनवावेत...

काही ग्रॅम वजनाचे धातूचे नाणे पाण्यात टाकल्यावर बुडते, परंतु हजारो टन वजनाचे जहाज पाण्यावर तरंगते. हे कसे काय शक्य होत असेल?A coin weighing a few grams sinks when dropped into the water, but a ship weighing thousands of tons floats on the water. How is this possible?

Image
काही ग्रॅम वजनाचे धातूचे नाणे पाण्यात टाकल्यावर बुडते, परंतु हजारो टन वजनाचे जहाज पाण्यावर तरंगते. हे कसे काय शक्य होत असेल? A coin weighing a few grams sinks when dropped into the water, but a ship weighing thousands of tons floats on the water. How is this possible? याचे कारण इ.स.पू. २५० मध्ये आर्किमिडीज यांनी सांगितले - द्रवामध्ये एखादी वस्तू टाकल्यास, ती त्याच्या आकारमानाएवढे द्रव बाजूला सारते. पाण्यात एखादी वस्तू टाकली की पाण्याचा स्तराची उंची वाढते, हे तत्व आपण रोज पाहतो, परंतु त्याचे जीवनात उपयोजन करण्यासाठी त्याचा शास्त्रीय पध्दतीने अभ्यास करावा लागतो. तेच तत्व व्यवहारात उपयोग कसे आणले ते जाणून घेणार आहोत. "विज्ञान हे विषयाच्या ज्ञानाचे संघटन आहे, तर शहाणपण हे आयुष्याच्या सर्व पैलूंचे संघटन आहे." - इमॅन्युएल कान्ट कोणत्याही द्रवपदार्थात एखादी वस्तू तरंगते किंवा बुडते हे ठरवण्यासाठी जा गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतात, त्या आपण समजून घेणार आहोत. १. वस्तूची घनता  २.  उत्कर्ष बल ३. आर्किमिडीजचे तत्व ४. शोधाची कथा ५. जीवनात उपयोजन ६. वैज्ञानि...

ताण-तणावाचा सामना करण्यासाठीचे ७ परिणामकारक उपाय / 7 Effective Ways to Face the Stress

Image
ताण-तणावापासून मुक्तता Relief from stress धकाधकीच्या जीवनात आपण विविध समस्यांना सामोरे जात असतो, तेव्हा मनामध्ये बैचेनी निर्माण होते, यामुळे अर्थातच मानसिक आरोग्य खालावते. सध्या नैराश्य व ताणतणाव हेच सर्वाधिक आरोग्याला घातक आहेत. ताण मेंदूवर वाईट परिणाम करतो, त्यामुळे आपण मानसिकरित्या आजारी पडतो, त्यामुळे आपल्या जैविक संतुलनावर परिणाम होतो. इतर व्यक्तीमुळे ताण निर्माण होतो,अशी  ताणाविषयी सर्व सामान्य व्यक्तींची पूर्व मते आहेत, परंतु बऱ्याच मानसशास्त्रज्ञांनी मांडलेल्या विचारा नंतर ताण हा प्रत्येक वेळी हानिकारकच असतो असे नाही किंबहुना, * कोणत्याही बदलाला दिली जाणारी प्रतिक्रिया म्हणजे  ताण होय. *  'ताणा'शिवाय जीवन शक्यच नाही, परंतु अति-ताण किंवा दीर्घकालीन ताण अपायकारकच असतो असे संशोधनाचे जनक 'हान्स सॅली'  यांनी सांगितले. १९३५ मध्ये  सॅली यांनी सिद्धांत मांडला, यानुसार ताण हा कोणत्याही आजाराचे प्रमुख कारण असून दीर्घकालीन ताणामुळे दूरगामी रासायनिक बदल घडून येतात.याच्या पुढील अवस्था आहेत. तणावस सामोरे जातानाच्या तीन अवस्था : हान्स सॅलीचा ...

जैवविविधतेचे संवर्धन करण्याचे ६ फायदे, 6 benefits of Conserving Biodiversity

Image
२२ मे रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन साजरा केला जातो. याचा उद्देश जैवविविधतेच्या संवर्धन करण्यासाठी जागृती करणे आहे. २०२० मध्ये या दिनाचा विषय आहे : मानवाच्या समस्यांचे उपाय निसर्गात आहेत.   जैवविविधता म्हणजे विविध प्राणी आणि वनस्पती यांची 1. प्रजाती दरम्यान असणारी जनुकीय विविधता  2. दोन वेगवेगळ्या प्रजातींमध्ये असणारी विविधता तसेच 3. वस्तीस्थानातील व परिसंस्थेतील यांच्यातील विविधता होय.   प्रत्येक प्राणी व वनस्पती यांना जगण्यासाठी आवश्यक अन्न व संसाधने निसर्गात उपलब्ध असतात, तसेच होणारे रोग व जखमा नैसर्गिकरित्या बऱ्या करण्याची क्षमता निसर्गात असते. पर्यावरणातील जैवविविधता मानवजातीला अनेक सेवा पुरवत असते. १. मृदेचे संवर्धन व पोषक द्रव्यांचे पुनर्वापर :  मृदेतून वनस्पतींना पाणी व पोषकद्रवे मिळतात व त्यातून अन्ननिर्मिती होते. जमिनीत असलेल्या विविध सूक्ष्मजीव हे जमिनीतील पोषक द्रव्यांचा वनस्पतीला वापरता येतील अशा प्रकारात रूपांतर करून अन निर्मितीस मदत करतात तसेच जमिनीची सुपीकता टिकवण्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो परंतु अलीकड...

३ कारणे ज्यामुळे पाण्याची वाफ अनेक डब्यांची ट्रेन ओढू शकते!! What Makes A Steam Locomotive Work?

Image
पाणी हे जीवन आहे. पण पाण्यामध्ये असे काय आहे त्यामुळे पाणी हे सजीवसृष्टीचा आधार आहे? १६ व्या शतकात ज्ञानाच्या पुनरुत्थान होत असताना, मानव तर्कशुद्ध व वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करू लागला. निसर्गातील कुतूहलांचे उत्तर निरीक्षणाने व जीवनातील समस्यांचे निराकरण वैज्ञानिक पद्धतीनने प्रयोग करून करू लागला. उष्णतेचा वापर करून यांत्रिक कार्य करणे शक्य झाले ते वाफेच्या इंजिनमुळे.१८व्या शतकामध्ये त्यातूनच औद्योगिक क्रांती झाली. उष्णतेचा वापर करून यांत्रिक कार्य करणे शक्य झाले ते वाफेच्या इंजिनमुळे. स्वयंपाक करताना प्रेशर कुकरचा वापर अन्नपदार्थ शिजवण्यासाठी करतात . यामध्ये पाणी जेव्हा उच्च दाबाखाली पाण्याचा उत्कलनांक वाढतो, त्यामुळे पदार्थ लवकर शिजतो. याच पाण्याचा वाफेचा उपयोग वाफेचे इंजिन चालवण्यासाठी केले जातो. परंतु वाफेत एवढी ताकद येते कुठून की जी अनेक डब्यांची रेल्वे ओढू शकते?   १. पाण्याचे तापमान १०० डिग्री झाल्यावर पाण्याची लगेच वाफ का होत नाही? : अप्रकट ऊष्मा २.  पाण्याच्या रेणूंमध्ये असणाऱ्या सुप्त ऊर्जेचे रहस्य : हैड्रोजन बंध ३. जेव्हा वाफ पाण्याप्र...