आयुका :IUCAA ,पुणे

२८फेब्रुवारी १९२८ रोजी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ 'चंद्रशेखर व्यंकट रमण' यांनी 'रमण परिणाम'चा शोध लावला व त्यांना या शोधा निमित्त 'नोबेल' पारितोषिक प्राप्त झाले आणि या दिवसाचे औचित्य साधून २८फेब्रुवारी हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा करतात. त्या दिवशी सर्वांसाठी ज्ञान विज्ञाचा अमूल्य खजाना खुला करण्यासाठी सुसज्ज असते आपल्या जयंत नारळीकर सरांची 'आयुका'. पुणे विद्यापीठाच्या आवारात एक संशोधन संस्था 'आयुका' नावाने सुप्रसिद्ध तसेच अत्यंत लोकप्रिय आहे.१९८८ मध्ये जागतिक दर्जाची ख्याती असणारे खगोलशास्त्रज्ञ 'जयंत नारळीकर' यांनी अजित केंभावी व नरेश दधीच यांच्यासोबत आयुकाची स्थापना केली. विज्ञान प्रेमींना आपला विज्ञान दिवस अविस्मरणीय घालवायचा असेल तर पुण्यातील आयुका सारखे उत्तम ठिकाण दुसरे नसेल. विद्यापीठातील प्रवेशद्वारापासून पायी चालत जाताना विद्यापीठातील भुलभुलय्या ठरलेले रस्ते जरा वेळ घेत असत, पण आता तीही समस्या गायब झाली आहे.जवळच इको-फ्रेंडली बस येते व विद्यापीठांमध्ये हवे त्या ठिकाणी सोडते, ते ही अगदी विनामूल्य. विज्ञान...